मुंबई, 01 जानेवारी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. त्याचा कधी थेट तर कधी नकळत परिणाम कच्चा तेलावर होत आहे. जगभरात आर्थिक मंदीचं सावट आहे. कच्च्या तेलात गेल्या एक महिन्यात मंदी दिसून आली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $85.91 वर पोहोचला आहे. तर WTI प्रति बॅरल $80.26 वर जाऊन पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे 1 जानेवारी रोजी सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे दिसून आले आहे.
आज भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. केरळमध्ये पेट्रोल 0.72 रुपयांनी वाढल्यानंतर 102.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी डिझेलचा दर 0.67 रुपयांनी वाढून 95.44 रुपये प्रति लिटर झाला आहे. याशिवाय पंजाबमध्ये पेट्रोल 96.89 रुपये (0.29 ची वाढ) आणि डिझेल 87.24 रुपये (0.28) ची वाढ झाली आहे आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यासह इतर काही राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत.
हे ही वाचा : फक्त Nexonच नाही, Tataच्या ‘या’ Electric Carसाठी ग्राहकांच्या रांगा, पाहा किंमत अन् फिचर्स
देशातील प्रमुख शहरातील तेलाचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
या शहरांमध्ये लागू होतील नवीन दर
नोएडामध्ये पेट्रोल 96.59 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर.
लखनौमध्ये पेट्रोल 96.33 रुपये आणि डिझेल 89.53 रुपये प्रति लिटर झाले आहे.
पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे.
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.
हे ही वाचा : मुंबई ते कोल्हापूर अवघ्या एका तासात, ‘या’ इलेक्ट्रिक कारचा नादच खुळा
एका एसएमएसवर जाणून घ्या नवे दर
पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकता. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकता. तर, HPCL ग्राहक HP price आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.