राष्ट्रपिता ही सर्वोच्च उपाधी, महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

राष्ट्रपिता ही सर्वोच्च उपाधी, महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

महात्मा गांधींबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहे आणि देशानं त्यांना राष्ट्रपिता अशी दिलेली उपाधी हाच सर्वोच्च सन्मान असल्याने भारतरत्न देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जानेवारी : राष्ट्रपिता महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. देशातील लोकांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता अशी उपाधी दिली आहे. त्याशिवाय महात्मा गांधींबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहे आणि देशानं त्यांना राष्ट्रपिता अशी दिलेली उपाधी हाच सर्वोच्च सन्मान आहे. त्यामुळे महात्मा गांधींना भारतरत्न द्या असे आदेश केंद्र सरकारला देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, महात्मा गांधींना देश राष्ट्रपिता मानतो. राष्ट्रपिता ही सर्वोच्च उपाधी जनतेनं दिली आहे. याबद्दल आण्ही केंद्र सरकारकडे अहवाल मागू शकतो. पण भारतरत्न द्या असे आदेश देऊ शकत नाही. महात्मा गांधींना जास्ती जास्त उपाधी देण्याच्या याचिकेशी समहत असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

परीक्षेतला तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी देणार विद्यार्थ्यांना टिप्स

महात्मा गांधी हे भारतरत्न पुरस्कारापेक्षाही मोठे आहेत. जगभरात महात्मा गांधींची ख्याती असल्याने त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी जनहित याचिका आम्ही फेटाळून लावत आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. देशातील अनेक दिग्गजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. असाच गौरव महात्मा गांधींचाही व्हावा अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना राहुल गांधीवर भडकले रामचंद्र गुहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 11:51 AM IST

ताज्या बातम्या