अहमदनगर, 15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. शरद पवार विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कुस्ती लढायला समोर पैलवान नाही. समोर कोणी चांगलं लढायला नसल्यानं निवडणूक लढवण्यात मजा येत नाही. पवार साहेब नटरंग सारखे हातवारे करायला लागले आहेत.' असं म्हणत बार्शीमधील पवारांच्या हातवाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.'कुस्ती तर पैलवानांसोबत होते इतरांसोबत नाही', शरद पवारांनी हातवारे करून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता.