मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पहाडी पोपटांच्या तस्करीचा डाव फसला, वनविभागाने टाकली धाड!

पहाडी पोपटांच्या तस्करीचा डाव फसला, वनविभागाने टाकली धाड!

शहरातील आर्वी नाका परिसरात ऑस्कर फिश अँड पॉट दुकानावर ही कारवाई करण्यात आली.

शहरातील आर्वी नाका परिसरात ऑस्कर फिश अँड पॉट दुकानावर ही कारवाई करण्यात आली.

शहरातील आर्वी नाका परिसरात ऑस्कर फिश अँड पॉट दुकानावर ही कारवाई करण्यात आली.

  • Published by:  sachin Salve

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 05 मार्च : शहरातील आर्वी नाका परिसरातील एका दुकानात पहाडी पोपटाची तस्करी केली जात असल्याची घटना समोर आली आहे. वन विभागाने धाड टाकून पहाडी पोपटांसह इतर अन्य प्राण्यांना ताब्यात घेतलं आहे.

शहरातील आर्वी नाका परिसरात ऑस्कर फिश अँड पॉट दुकानावर ही कारवाई करण्यात आली. शहरात असणाऱ्या  या दुकानातून वन्यप्राण्यांना आणि पक्षांची विक्री केली जात आहे. याची माहिती पीपल्स फॉर अनिमल्सच्या कार्यकर्त्यांना मिळाली. वर्धा वनविभागाचे कर्मचारी आणि पीपल्स फॉर अनिमल्सचे कार्यकर्ते यांनी मिळून ही धाड घातली.

या पहाडी पोपटाची तस्करी होत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी धाड टाकून कारवाई केली. यासोबतच विविध जातीचे वन्यपक्षांची या दुकानांतून विक्री केली जात असल्याची माहिती पीपल्स फॉर अनिमल्स यांना मिळाली होती. चार ते पाच हजारात विकल्या जाणाऱ्या या पोपटाला मोठी मागणी आहे.

या प्रकरणी आरोपी सारंग खाडे याला अटक करण्यात आली असून वन्यजीव कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला आज वर्ध्याच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टाटा सन्सचे बँक खाते हॅक करण्याचा प्रयत्न,पोलिसांनी मॉलमधून केली अटक

दरम्यान, टाटा सन्सचे बँक खाते हॅक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार येथे टाटा सन्सचे बँक खाते हॅक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॅकर्सना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील मुंबई अहमदाबाद रोड, पेल्हार फाट्याजवळील डिकॅथलॉन मॉलजवळ इंडस बँकतील टाटा संसचे खाते हॅक करण्यासाठी हॅकर आला असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली आहे. डिकॅथलॉन मॉलच्या पार्किंगमध्ये आरोपी नसीम यासीन सिद्धीकी, तस्लीम परवेझ अन्सारी, गनजीव शामजीभाई बारय्या, रोज रामनिवास चौधरी,सतीश अजय गुप्ता, अनंत भुपती घोष, आनंद पांडूरंग नलावडे हे इंडस बँक कस्टमर आयडीचे अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करीत होते.

हॅकर्स टाटा सन्सचं जे बँक खातं हॅक करण्याचा प्रयत्न करत होते, त्यामध्ये तब्बल 200 कोटी रुपयांची रक्कम होती. हे आरोपी काही क्षणांतच खातं हॅक करणार होते. मात्र अखेरच्या क्षणी पोलीस तिथे धडकले आणि टाटा सन्सचे तब्बल 200 कोटी रुपये वाचले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुलाबी रंगाचा विवो मोबाईल फोन,एक निळ्या रंगाचा ओपो मोबाईल फोन, एक इंडस बँक कस्टमर आयडी क्रं. 34063 च्या अकाउंटवरील व्यवहाराची छायांकीत प्रत, एक निळ्या रंगाचा विवो मोबाईल फोन, एक पंजाब नॅशनल बँकेचा चेकची छायांकीत प्रत, एक काळ्या रंगाचा विवो मोबाईल फोन बंद स्थितीत असलेला , एक काळ्या रंगाचा ओपो मोबाईल फोन, एक काळ्या रंगाचा मोटो मोबाईल फोन, एक निळ्या रंगाचा विवो मोबाईल फोन, एक फिकट निळे आणि गुलाबी रंगाचा विवो मोबाईल फोन, एक लाल,सफेद व हिरव्या रंगाचा लावा मोबाईल फोन 90 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

First published:

Tags: Parrot, Wardha, Wardha news