Home /News /maharashtra /

लाजिरवाणं! दलित कुटुंबांना पिण्याचं पाणी देण्यास नकार, शिवीगाळ करत मारहाण

लाजिरवाणं! दलित कुटुंबांना पिण्याचं पाणी देण्यास नकार, शिवीगाळ करत मारहाण

महाराष्ट्रातल्या परभणी (Parbhani ) जिल्ह्यात एक लाजिरवाणा प्रकार घडला आहे. परभणीतल्या दलित समाजातील कुटुंबांना पिण्याचं पाणी देण्यास नकार देण्यात आला.

    परभणी, 09 जून: महाराष्ट्रातल्या परभणी (Parbhani ) जिल्ह्यात एक लाजिरवाणा प्रकार घडला आहे. परभणीतल्या दलित समाजातील कुटुंबांना पिण्याचं पाणी देण्यास नकार देण्यात आला. तसंच त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण (abuse and brutally assault) देखील करण्यात आली. पाथरी तालुक्यातील ही घटना आहे. दीड महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खेरडा गावात दीड महिन्यापूर्वी गावातील दलित समाजातील काही कुटुंबांना पिण्याचं पाणी देण्यास नकार देण्यात आला होता. तसंच त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण देखील केली होती. या प्रकरणी गावातल्या रामचंद्र नामदेव आमले, दगडू रामभाऊ आमले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. हेही वाचा- आज मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आरोपींना जामीन मिळाल्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा दलित समाजातील कुटुंबांना धमकावण्यास सुरुवात केली. 4 जूनला आरोपींनी पुन्हा संबंधित कुटुंबांना जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या व्हिडिओ क्लिपवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. यानंतर या प्रकरणी विकास गंगाधर वाहेळ यांनी 6 जूनला तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना पाथरी पोलिसांनी अटक केली. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Parbhani news, Parbhani police

    पुढील बातम्या