जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / परमबीर सिंग फरार नाहीत, देशातच आहेत; लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता

परमबीर सिंग फरार नाहीत, देशातच आहेत; लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता

परमबीर सिंग लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर: चार दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनामुंबई किला कोर्टाने फरार घोषित केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्याविरोधात 100 कोटी वसुलीचा बॉम्ब टाकून खळबळ उडवून परमबीर सिंग गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे कोर्टानं हा निर्णय सुनावला. मात्र परमबीर सिंग देशातच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परमबीर सिंग लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परमबीर सिंग यांना अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे. ते भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दिली. तसंच लवकरच मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून तपास यंत्रणेसमोर लवकरच हजर होणार असल्याचं वकिलांनी सांगितलं. हेही वाचा-  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात मोठी अपडेट मुंबई पोलिसांवर अविश्वास असून तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्रीय यंत्रणेला सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात परमवीर सिंग फिर्यादी असून खंडणी प्रकरणात आरोपी आहेत. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रार प्रकरणी 4 पोलीस अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक झाली आहे. परमबीर सिंग फरार घोषित गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे गायब आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी होईल अशी शक्यता होती. पण त्याआधीच खंडणी प्रकरणात परमबीर सिंग यांना मुंबई किला कोर्टाने फरार घोषित केलं. गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात फरार घोषित करण्यात आलं. याच प्रकरणी रियाज भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित करण्यात आलं आहे. याच गोरेगाव खंडणी प्रकरणी पोलीस निरीक्षक आशा कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा-  अरारारा खतरनाक Video! कधीच पाहिली नसेल इतकी वेगवान Food delivery परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर स्टेट सीआयडीने दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली. नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे. या दोघांनीही गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली. या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेण्याकरता हवालाचा वापर केला. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता. हवाला ॲापरेटर मोमिन याच्या माध्यमातून व्यवहार हा व्यवहार झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात