मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाईकवरून येऊन भर चौकात गोळीबार, राजकीय व्यक्तीच्या हत्येनं पंढरपूर हादरलं

बाईकवरून येऊन भर चौकात गोळीबार, राजकीय व्यक्तीच्या हत्येनं पंढरपूर हादरलं

पंढरपूर- सातारा रोडवर आज दुपारी एकच्या दरम्यान झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर- सातारा रोडवर आज दुपारी एकच्या दरम्यान झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर- सातारा रोडवर आज दुपारी एकच्या दरम्यान झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 26 जानेवारी : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास भागवत उर्फ बापू यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. पंढरपूर- सातारा रोडवर आज दुपारी एकच्या दरम्यान झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर- सातारा रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर विश्वास भागवत ऊर्फ बापू हे मित्रांसोबत एका दुकानाच्या समोर गप्पा मारत होते. तेव्हा तिथं दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकलवर येऊन विश्वास भागवत यांच्यावर गोळीबार केला. पहिली गोळी भागवत यांना लागली नाही, पण दुसर्‍या गोळीने त्यांचा घात केला.

हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी विश्वास भागवत यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे समजते. जमिनीच्या वादातून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. एक तरुण शेतकरी वर्गातील विश्वास भागवत यांनी काही वर्षापूर्वी शेतीतून व व्यवसायातून प्रगती केली होती. परंतु त्यांचा अशा धक्कादायक हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Pandharpur, Pandharpur crime, Pandharpur news