पंढरपूर, 30 ऑगस्ट: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पंढरपुरात प्रशासन हादरलं आहे. प्रकाश आंबेडकर उद्या पंढरपुरात दोन लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. पंढरपूरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी एसटी वाहतूक बंद असणार आहे. हेही वाचा… गणपती आणि मोहोरमच्या ताझिया एकाच मंडपात.. पाहा हिंदू-मुस्लिम एकोप्याचं दर्शन केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत असताना अनेक गोष्टींना सूट दिली आहे. मात्र, मंदिर प्रवेश याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मंदिर प्रवेशाचा मुद्दा हातात घेतलेला आहे. उद्या पंढरपुरात प्रकाश आंबेडकर दोन लाख वारकऱ्यांचा उपस्थितीत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारनं 31 ऑगस्टपूर्वी पंढरपूरचे मंदिर खुले केले नाही तर त्या ठिकाणी वारकरी, महाराज यांच्यासह लाखो लोकांच्या मदतीने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.
दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्याने ३१ ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला जमण्याचे समस्त वारकरी बांधवांना आवाहन करतोय. pic.twitter.com/6mi93QjpwL
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 25, 2020
वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर राज्यातील एसटी, बस सेवा चालू करण्यात आली. शासनाने पानटपऱ्या, सलून तसेच इतर व्यवसाय सुरू झाले. मात्र मंदिर अद्यापही बंद आहेत. शासनाने 31 ऑगस्ट पूर्वी पंढरपूरचे मंदिर खुलं झालं नाही तर लाखो वारकरी 31 ऑगस्ट रोजी मंदिरात प्रवेश करतील. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,’ असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. हेही वाचा… कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? आशिष शेलारांचा खोचक सवाल …तर विठ्ठल मंदिर बंद का? राज्यात दारू, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे व ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला केला आहे. सरकार प्रतिसाद देत नसल्यानं 31 ऑगस्टला मोठ्या संख्येने पंढरपूरला येण्याचं आवाहन वारकरी बांधवांना करण्यात आलं आहे.

)







