पालघर, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून गावागावातील सीमाही बंद करण्यात आल्या आहे. परंतु, पालघरमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे दरोडेखोर समजून तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. परंतु, आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. पालघरमध्ये तीन जणांच्या हत्या प्रकरणामुळे अवघा देश हादरून गेला होता. आता या प्रकरणाबद्दल नवीन खुलासा समोर आला आहे. चोर दरोडेखोर समजून जमावाने केलेल्या हल्ल्यात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज यांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा - कोरोनामध्ये पोलीस का ठरतायत देवदूत, हा VIDEO तुम्हीही म्हणाल ‘एक नंबर साहेब’ दरम्यान, या घटनेनंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या महंतांनी या घटनेचा निषेध करत घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यात ठार झालेल्या तीन जनांपैकी त्रंबकेश्वरच्या हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्ष गिरी महाराज देखील ठार झाले आहे आणि हे महाराज ज्या मंदिराची पुजा करत होते त्रंबकेश्वर मधील मोक्याच्या ठिकाणी ही मंदिराची जागा असून या जागेवरून वाद सुरू आहे आणि याच वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने या हत्याकांडाला नव वळण मिळालं आहे. काय आहे प्रकरण? गुरुवारी पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हेही वाचा - ‘या’ फोटो मागील खरी कहाणी ऐकाल, तर खाकी वर्दीला कराल सॅल्युट! काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावात देखील असाच एक प्रकार घडला होता. ठाणे येथील एका समाजसेवकाला मारहाण झाली होती. तसंच पोलिसांची गाडी आणि एका खासगी वाहनांवर दगडफेक करून वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







