जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोर्टाच्या चकरा मारून कंटाळलात? हा पर्याय करा ट्राय, Video

कोर्टाच्या चकरा मारून कंटाळलात? हा पर्याय करा ट्राय, Video

कोर्टाच्या चकरा मारून कंटाळलात? हा पर्याय करा ट्राय, Video

राष्ट्रीय लोक अदालत हा जलद न्याय मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. 11 फेब्रुवारी 2023 रोजी यंदाची पहिली लोक अदालत आहे.

  • -MIN READ Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

    परमेश्वर सोनावणे, प्रतिनिधी उस्मानाबाद, 10 फेब्रुवारी : अनेकदा न्यायालयाच्या चकरा मारूनही न्याय मिळण्यास विलंबच होतो, असा अनुभव काहींना आला असेल. कंटाळून ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’, असेही वाटले असेल. परंतु, न्यायप्रक्रियेत जलद न्याय मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. हे मात्र अनेकांना माहीत नसेल. हा पर्याय म्हणजे राष्ट्रीय लोक अदालत होय. याच राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून देशात अनेक वाद निकाली निघाले आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    राष्ट्रीय लोक अदालत म्हणजे काय? राष्ट्रीय लोक अदालत ही एक पर्यायी विवाद निवारण यंत्रणा आहे. न्यायालयात प्रलंबित असलेले वाद तडजोडीने मिटवण्याचा तो एक मंच आहे. या ठिकाणी सामंजस्याने वादाची प्रकरणे सोडविली जातात. जी दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरतात.

    Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त करा महाराजांची पूजा, पाहा कुठं मिळतायत आकर्षक मूर्ती, Video

    कोणत्या प्रकारची प्रकरणे निकाली काढली जातात?

    लोक अदालतीसाठी प्रामुख्याने समेट करण्यासारखी दिवाणी प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे, MACT प्रकरणे आणि लहान गुन्ह्यांची प्रकरणे संदर्भित केली जातात. अशा प्रकरणांवर त्याच दिवशी निकाल दिला जातो.

    Love Story : धर्माच्या भिंती तोडून केलं लग्न, पाहा कसा सुरू आहे नाशिकच्या आसिफ-रसिकाचा संसार, Video

    लोक अदालतीतील निकालाचे फायदे

    लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय तात्काळ मिळतो. पैसा आणि वेळेची बचत होते. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कोर्ट फी ची रक्कम परत मिळते. परस्पर संमतीने निकाल होत असल्यामुळे एकमेकातील द्वेष वाढत नाही आणि कटूताही निर्माण होत नाही. HSC Exam 2023: कॉपी बहाद्दर सावधान! परीक्षा केंद्रावर आहे ‘तिसऱ्या डोळ्या’चा वॉच, Video कधी आहे लोक अदालत लोक अदालत दर तीन महिन्यांनी संपूर्ण भारतभरातील न्यायालयांमध्ये भरवली जाते. या महिन्यामध्ये दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये ही लोक अदालत भरणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात