मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad : भक्तीत तल्लीन होऊन तुडवलं स्वत:चं मुल!; मंदिरात आजही तरंगतात विटा

Osmanabad : भक्तीत तल्लीन होऊन तुडवलं स्वत:चं मुल!; मंदिरात आजही तरंगतात विटा

संत गोरोबा काका

संत गोरोबा काका

वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून गोरोबा काका यांना ओळखले जाते. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील ते संत असल्याचे मानले जाते. संतकवी गोरोबा काका यांचा जन्म तेर येथे झाला.

उस्मानाबाद , 18 ऑगस्ट : विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत. पांडुरंगाचे असेच एक भक्त होऊन गेले संत गोरोबा कुंभार म्हणजेच गोरोबा काका (Sant Goroba Kumbhar). वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून गोरोबा काका यांना ओळखले जाते. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील ते संत असल्याचे मानले जाते. संतकवी गोरोबा काका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे झाला. आज याठिकाणी भव्य मंदिर असून प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या एकादशीला याठिकाणी भक्तांची गर्दी होते. तेर गावाला गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. तेर येथील काळेश्वर या ग्रामदैवताचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली ८ ही मुले काळेश्वराजवळील स्मशानात पुरली होती. ...आणि मुलगा जिवंत केलं पुढे कालांतराने परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेष घेऊन त्यांचे घरी आले. तेव्हा देवांनी त्यांना विचारले की तुम्ही दुःखी का आहात? माधवबुवांनी सांगितले की, आमची आठही मुले देवाने नेली. म्हणून दुःखी आहोत नंतर देवाने आठ मुलांना जेथे पुरले, ती जागा दाखविण्यास सांगितले. माधवबुवांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानात नेले व देवास आठही मुले कोठे पुरली ती जागा दाखविली. देवांनी सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितली. त्याप्रमाणे माधवबुवांनी आठही मुलांची प्रेते बाहेर काढली. देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गात पाठविले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला. तोही स्वर्गाच्या मार्गाने निघाला. परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही. भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुवा रखुमाईच्या स्वाधीन केले. देव म्हणाले तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले. अशी एक आख्यायिका संत गोरोबा काका यांच्या चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी सांगितली आहे. पायाने मूल तुडविले संत गोरा कुंभार हे आपलं नित्यकर्म करत असतांना देखील विठ्ठल नामात तल्लीन असत. कुंभारकाम करत असतांना पांडुरंगाचे गुणगान सतत त्यांच्या मुखी असायचे. एकदा त्यांची पत्नी आपल्या रांगणाऱ्या मुलाला अंगणात ठेऊन पाणी आणायला गेली. त्यावेळी अंगणात गोरा कुंभार माती तुडवीत होते नामसंकीर्तनात ते इतके तल्लीन झाले की रांगणारे बाळ त्यांच्याकडे येत असल्याचे भान देखील त्यांना राहिले नाही. बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यात पडले आणि गोरा कुंभार यांच्या पायाखाली तुडविले गेले याची जाणीव देखील त्यांना राहिली नाही. हेही वाचा- ऐतिहासिक वारसा आणि दारूगोळ्याचे भंडार असलेला परांडा किल्ला गोरा कुंभार यांनी आपले दोन्ही हात तोडून घेतले विठ्ठलाच्या भजनात तल्लीन झालेल्या गोरा कुंभार यांना तुडविताना मूल रडत असल्याचे देखील लक्षात आले नाही. पाणी घेऊन आलेल्या त्यांच्या पत्नीने अंगणात आपल्या चिमुकल्याला शोधले पण तो सापडला नाही. तिचे लक्ष गोरा कुंभार तुडवीत असलेल्या मातीकडे गेले, ती माती रक्ताने लाल झालेली तिला दिसली आणि तिने हंबरडा फोडला. प्रायश्चित्त म्हणून गोरा कुंभार यांनी आपले दोन्ही हात तोडून घेतले. थोट्या हातांना हात फुटले हात तुटल्याने त्यांचा व्यवसाय देखील बसला. नंतर स्वतः विठ्ठल -रुखमाई त्यांच्या घरी येऊन राहू लागले. आषाढी वारीच्या निमित्ताने संत मंडळी पंढरपुरास निघाली असताना वाटेत संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी तेरढोकी येथून संत गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीला देखील सोबत घेतले. संत ज्ञानेश्वरांसह सर्व संत मंडळी कीर्तन ऐकावयास बसली. संत गोरा कुंभार आपल्या पत्नीसह कीर्तनात बसले होते. त्या दरम्यान वारकरी पांडुरंगाचा नामगजर करीत हात वर करून टाळ्या वाजवू लागले. गोरा कुंभार यांनी देखील अभावितपणे आपले थिटे हात उचलले. त्याक्षणी त्या थोट्या हातांना हात फुटले. सर्वांना अतिशय आनंद झाला संत मंडळीनी विठ्ठलाचा जयजयकार केला. तुडविले गेलेले बाळ रांगायला लागले पतीचे हात पाहून तिला समाधानाचे भरते आले तिने चालू असलेल्या कीर्तनात पांडुरंगाची प्रार्थना केली ‘पांडुरंगा माझे मूल पतीच्या पायी तुडविले गेले त्यामुळे आम्ही फार दुःखी-कष्टी आहोत तुला माझी करुणा येऊ दे, माझे मूल मला परत दे‘ ती पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली. आणि काय आश्चर्य घडले त्या कीर्तनात चिखलात तुडविले गेलेले तिचे बाळ रांगत-रांगत तिच्याकडे येत असल्याचे तिने पाहिले. आनंदाच्या भरात तिनं बाळाला कडेवर उचललं. सगळ्यांनी विठ्ठलाच्या नावाचा जयजयकार केला. अशी आख्यायिका कीर्तनकार किरण बनसोडे (संपर्क क्रमांक- 7447312471 ) यांनी सांगितली. तरंगणारी वैशिष्ट्यपूर्ण वीट मंदिरात पाण्यावर तरंगणारी अशी वीट आहे. गोरोबा काकांना पांडुरंगाचं वरदान होतं की त्यांनी बनवलेली एकही वीट पाण्यामध्ये बुडू शकली नाही. अशी आख्यायिका सांगितली जाते. तेरला येणारे अनेक भक्त तरंगणारी वीट भाळी लावतात. अनेक भक्तांनी येथील विटा मोठ्या श्रध्देनं घरी नेऊन देव्हार्‍यात पूजेला ठेवल्या आहेत. हेही वाचा- नर मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी गोरोबा काकांची यात्रा संत गोरोबा काकांची यात्रा प्रत्येक वर्षी भरते. या यात्रेसाठी जवळपास 45 ते 50 वारकरी दिंड्या सहभागी होतात. लाखो भाविक यात्रेस हजेरी लावत असतात. उस्मानाबाद शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा अजूनही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात परदेशाशी व्यापार संबंध असलेले हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबा काका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्राला ज्ञात आहे. संत गोरोबा काकांचा जन्म याठिकाणी झाला. Shree Saint Goroba Kaka Temple Ter. गुगल मॅपवरून साभार संत गोरा कुंभार यांची समाधी शके 1239 चैत्र कृष्ण त्रयोदशीला संत गोरा कुंभार यांनी समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावी आहे. त्या ठिकाणी असलेलं त्याचं घर आणि मूल तुडविलेली जागा आज देखील भाविक दाखवितात. संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर चित्रपट  संत गोरा कुंभार नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला असून त्याचे दिग्दर्शक राजा ठाकूर होते. संत गोरा कुंभार नावाचे नाटक देखील मराठी रंगभूमीवर येऊन गेले आहे. या नाटकात प्रसाद सावकार यांनी गोरोबा काकांची भूमिका केली होती. 1978 साली भगत गोरा कुंभार नावाचा चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश रावल यांचे होते.
First published:

Tags: Osmanabad, Temple, उस्मानाबाद, मंदिर

पुढील बातम्या