पुणे,11 फेब्रुवारी : राज्यात किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने थंडी कमी होत चालली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढल्याने झळा असह्य होत आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान 34 अंशाच्या वर गेल्याने फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासूनच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरम्यान मागच्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात देशातील उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली आहे.
धुळे आणि जळगाव येथेही किमान तापमानाचा पारा वाढून 10 अंशांवर पोहोचला आहे. किमान तापमानातील वाढ आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पारा पुन्हा घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे ही वाचा : Beed District Bank : बीड जिल्हा बँकेचा अजब कारभार, शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये काढण्याची मुभा
निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमान 34 अंशांच्या पुढे गेला आहे.
मुंबईतील हवामान विभाग असलेल्या सांताक्रूझ येथे पारा 36 अंशांच्या वर तर निफाड आणि सोलापूरमध्ये 35 अंशांवर पोहोचला आहे. कमाल आणि किमान तापमानात 13 ते 25अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे गारठा असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा जाणवत आहेत.
दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 34.2 (11.4), जळगाव 34.6 (10.0), धुळे 34.0 (10.0), कोल्हापूर 32.8 (18.3), महाबळेश्वर 31.0 (15.9), नाशिक 34.7 (12.5), सांगली 34.8 (16.9), सातारा 34.0 (14.4), सोलापूर 35.8 (16.2), औरंगाबाद 33.2 (10.2), अकोला 35.4 (12.9).
हे ही वाचा : Beed : पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video
अमरावती 33.4 (13.4), बुलडाणा 32.0 (15.6), ब्रम्हपूरी 34.1 (13.8), चंद्रपूर 32.0(15.6), गडचिरोली 32.0(12.0), गोंदिया 31.5(12.2), नागपूर 32.9(12.2), वर्धा 32.8(14.0), यवतमाळ 33.5 (14.5) तापमानाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heat, Weather Forecast, Weather Update, Weather Warnings