मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed District Bank : बीड जिल्हा बँकेचा अजब कारभार, शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये काढण्याची मुभा

Beed District Bank : बीड जिल्हा बँकेचा अजब कारभार, शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये काढण्याची मुभा

बीडच्या केज तालुक्यातील आडस येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पिक विम्याची जमा झालेली रक्कम देण्यास बँक प्रशासन टाळाटाळ करत आहे.

बीडच्या केज तालुक्यातील आडस येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पिक विम्याची जमा झालेली रक्कम देण्यास बँक प्रशासन टाळाटाळ करत आहे.

बीडच्या केज तालुक्यातील आडस येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पिक विम्याची जमा झालेली रक्कम देण्यास बँक प्रशासन टाळाटाळ करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

बीड, 08 फेब्रुवारी : बीडच्या केज तालुक्यातील आडस येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत पिक विम्याची जमा झालेली रक्कम देण्यास बँक प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पिक विमा काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना केवळ 2 हजारांवर दिले जात आहेत. कॅश उपलब्ध नाही असे कारण दाखवून शेतकऱ्याला परत पाठवण्यात येत आहे. नशीबाने मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेने अडवल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

पावसाची दडी, येलोमोझ्याक, अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीने सरसकट विमा द्यावा अशी शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनांची मागणी आहे. आडस  येथील जिल्हा बँकेच्या शाखेत खात्यावरील रक्कम काढण्यासाठी जाणाऱ्यां शेतकऱ्यांना अजब अनुभव येत आहे. विमा पोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 7,9,20,30 हजार अशी रक्कम आहे. 

हे ही वाचा : सांगलीच्या गुलाबाचा देशात डंका! 2 एकरातून करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO

स्लिप भरली की, त्यातील फक्त २ हजार रुपये दिले जात आहे. यासाठी कॅश नसल्याचे कारण सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी मागील आठ-दहा दिवसांपासून बँकेच्या वाऱ्या करत आहेत. हक्काचे पैसेही मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले असून जिल्हा बँकेच्या गलथान कारभारा विरुद्ध असंतोष पसरला आहे.

बीड जिल्ह्यात उसतोड कामगारांची कमतरता

बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोडणीच्या हंगामात सर्वाधिक कामगार बीड जिल्ह्यातून देशभर जातात. संपूर्ण देशाची गरज भासवणाऱ्या या जिल्ह्यातच सध्या ऊसतोड कामगारांची कमतरता भासत आहे.

काय आहे समस्या?

बीड जिल्ह्यात जवळपास 8 लाख ऊसतोड कामगार आहेत. यामधील 50 टक्के कामगार दरवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर कामासाठी परराज्यात जातात. बीड जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा हंगामा सुरू होऊन तिसरा महिना उलटला आहे तरी जिल्ह्यातील माजलगाव, तालुक्यामध्ये जवळपास 10 हजार हेक्टर, वरील ऊस शेतातच उभा आहे.

हे ही वाचा 'शेतात गांजा लावू द्या', बेरोजगार अभियंत्याने केली मागणी, पत्र व्हायरल

अनेक साखर कारखाण्यांनी ऊस टोळ्यांशी करार केला असला तरी जास्त पैसा मिळत असल्यानं कामगारांचा परराज्यात जाण्याचा कल वाढलाय. त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.

First published:

Tags: Beed, Beed news