Home /News /maharashtra /

Akola : नाल्याच्या पाण्यासह घरात सापही शिरले, नागरिकांच्या त्रासात भर! पाहा VIDEO

Akola : नाल्याच्या पाण्यासह घरात सापही शिरले, नागरिकांच्या त्रासात भर! पाहा VIDEO

नागरिकांच्या

नागरिकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी

अकोला शहरातील मनपा क्षेत्रात नव्याने हद्द वाढ झालेल्या अंबिका नगर येथे अनेकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले आहे.

    अकोला, 23 जुलै : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने (heavy rainfall) हाहाकार माजवला आहे. पावसाच्या पाण्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. अकोला शहरातील मनपा क्षेत्रात नव्याने हद्द वाढ झालेल्या अंबिका नगर येथे अनेकांच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले आहे. अनेक घरातील कपडे धान्यासह वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्यासह सापांचंही आगमन होत आहे. गेल्या वर्षीपासून हा त्रास असून यात स्थानिक नागरिकांचे  मोठे नुकसान होत आहे. परंतु, प्रशासन याकडे दुर्लक्ष (Neglect of administration) करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे. अकोला महानगरपालिकेने हा परिसर हद्दवाढ क्षेत्रात घेतला असून अंबिका नगर, गुरुदत्त नगर, आश्रय नगर, मनोहर कॉलनी, नरेंद्र नगर, मेहरे नगर येथील नागरिक अनेक समस्या भोगत आहेत. या परिसरात अद्यापही कुठल्या सुविधा प्राप्त झाल्या नाहीत. सुविधा पुरविण्यात महानगरपालिका तसेच स्थानिक नगरसेवक अपुरे पडत असल्याचे नागरिक सांगत आहे. अंबिका नगर येथील मुख्य रस्त्यावर असलेला नाला हा लोकवस्तीत काढून लेआऊट धारकांचे भले करण्याचा प्रताप अकोल्यातील महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने केला असल्याचा आरोप सुद्धा स्थानिक नागरिकांनी केला आहे. हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची 'ही' तरुणी करणार सादरीकरण, VIDEO लोकांच्या घरामध्ये गुडघे इतके पाणी या परिसरात लोकांच्या घरामध्ये गुडघे इतके पाणी साचले असून या परिसरातील नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवकाकडे तक्रार केली असता, आपण या परिसरात प्लॉट घेतलाच का? असा उलट प्रश्न केला जात असल्याचे नागरिक सांगतात. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही. येथील पाणी मुख्य नाल्यात सोडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त शहराची हद्दवाढ झाल्यानंतर हा परिसर महापालिका क्षेत्रात आला.  मात्र, कुठल्याही सोयीसुविधा महापालिकेने पुरविल्या नाही. माजी नगरसेवकांना याबद्दल जाब विचारला असता, ते या परिसरात घर कशाला घेतले, असा उलट सवाल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. लेआऊट धारकाच्या फायद्यासाठी नगररचना विभागाने हा नाला लोकवस्तीत वळविल्याचा आरोपही नागरिकांनी केला. महानगरपालिकेने हा परिसर हद्दवाडी क्षेत्रात घेतला. मात्र, महापालिका केवळ टॅक्स वसूल करण्याचे काम करते. परंतु, सोयीसुविधांच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे नागरिक सांगतात. अकोला महानगरपालिकेच्या वाढीव क्षेत्रामधल्या अंबिका नगरमधील नागरिकांना होणाऱ्या समस्याबद्दल महानगरपालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी यांच्याशी आमच्या प्रतिनीधींनी संपर्क केला असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.
    First published:

    Tags: Akola, Akola News, Rain, Rain flood, Rainfall

    पुढील बातम्या