मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा; बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत, पाहा VIDEO

Beed : बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा; बस चालकांसह प्रवाशांची तारेवरची कसरत, पाहा VIDEO

X
बसस्थानकाला

बसस्थानकाला खड्ड्यांचा विळखा

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप आलं आहे. बस स्थानकात गुडघ्या इतक्या पाण्यातून प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.

  बीड, 23 जुलै : बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकातून दररोज शेकडो प्रवासी येजा करतात. राज्यातील विविध ठिकाणी जाण्याकरिता येथून एसटी उपलब्ध आहे. नेहमीच गजबजलेलं बस स्थानक असून देखील हे बस स्थानक सुविधांपासून दूर आहे. बस स्थानकात खड्डे पडली (potholes in bus stand) आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचून (central Bus Stand beed) बस स्थानकाला डबक्याचे स्वरूप आले आहे. डबक्यातील साचलेले खराब पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. यातून मार्ग काढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. यासह बस स्थानकात स्वच्छतेचा अभाव असून, पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे (passengers) हाल होत आहेत. 

  मागील आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप आलं आहे. बस स्थानकात गुडघ्या इतक्या पाण्यातून प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. बस स्थानकात खड्डे देखील असून यात पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे बस चालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानक विभागाकडून इथं पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली नाही. मोकाट जनावरांचा संचार याठिकाणी दिसतो, तसेच बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे.

  Beed MSRTC Bus Stand

  गुगल मॅपवरून साभार

  हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची 'ही' तरुणी करणार सादरीकरण, VIDEO

  बस स्थानकामध्ये खड्डे पडले असून त्यात पाणी साठले आहे ही सत्यता आहे. मात्र बस स्थानकालगत असलेला रस्ता नव्याने तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची उंची बस स्थानकाच्या रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक असल्याने तेथील पाणी बस स्थानकात येत आहे. यावर लवकरच उपाययोजना करून प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय कुमार मोरे यांनी दिली. 

  हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त

  बसमधील सीट फाटलेली आहेत. बसमध्ये अस्वच्छता आहे. बस स्थानक परिसरात देखील अस्वच्छता आणि खड्डे असून त्यात पाणी साठल्याने आम्हाला त्रास होत असल्याने प्रवाशी पंडित कांबळे यांनी सांगितले. 

  First published:
  top videos

   Tags: Beed, Beed news, Maharashtra News, Rain