मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : मुलांवर लक्ष आहे ना? ग्रामीण भागातील विद्यार्थीही Child Pornography च्या जाळ्यात, VIDEO

Beed : मुलांवर लक्ष आहे ना? ग्रामीण भागातील विद्यार्थीही Child Pornography च्या जाळ्यात, VIDEO

X
ग्रामीण

ग्रामीण भागातील विद्यार्थीही Child Pornography च्या जाळ्यात

चाईल्ड पोर्नोग्राफीत (child pornography) बीड सारखा ग्रामीण भागाचे नाव समोर आले आहे. यातील सर्वाधिक प्रकार लॉकडाऊन (Lockdown) काळातील असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

    बीड, 29 जुलै: नेहमीच कुठल्या ना कुठल्या विषयात चर्चेत असणारा बीड जिल्हा पुन्हा एकदा एका वाईट गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीत (child pornography) बीड सारखा ग्रामीण भागाचे नाव समोर आले आहे. यातील सर्वाधिक प्रकार लॉकडाऊन (Lockdown) काळातील असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अशा वाढल्या प्रकरणांमुळे पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचं बनलं आहे.

    जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी एक-दोन नव्हे तर तब्बल चार चाइल्ड पोर्नोग्राफी गुन्ह्याची नोंद झाली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे 2,अंबाजोगाई पोलीस स्टेशन येथे 1, बीड शहर पोलीस स्टेशन येथे 1 गुन्ह्यांची नोंद आहे. ग्रामीण भागात चाइल्ड पॉर्नोग्राफीचे चार गुन्हे दाखल होणे ही धक्कादायक बाब आहे. सायबर सेलच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी, बीडच्या पोलीस अधीक्षकांना आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रफीत व आयपी अ‍ॅड्रेस देऊन कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे सायबर सेल अधिक ऍक्टीव्ह झाले आहे. सायबर सेलचे विशिष्ट अधिकारी या सर्व प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क आहेत.

    हेही वाचा- रेल्वे स्थानकांवर सुरू झाली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम', पाहा काय होणार तुमचा फायदा, VIDEO

    लॉकडाऊन दरम्यान शाळा देखील बंद होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. यात विद्यार्थ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. याचाच फायदा घेत मुलांना शिकार बनवले गेले आहे. मुलांना तेवढी समज नसल्याने नको त्या लिंक, शेअर, फॉरवर्ड झाल्याची प्रकरणे समोर येतात.

    दोन गुन्हे आता बीडच्या सायबर विभागाकडे तपास करण्यासाठी वर्ग करण्यात आले आहेत. यात विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. सध्याच्या युगात तरुण पिढी ही टेक्नॉलॉजी लेस झाली आहे. त्यामुळेच अशा चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणे वाढू लागली आहेत. पालकांनी आपल्या पाल्यावर नजर ठेवण्याची गरज भासू लागली आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफी सायबर क्राईम मधला सर्वात मोठा गुन्हा आहे. अठरा वर्षाखालील मुली आणि मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे. जागतिक स्तरावर देखील या गुन्ह्याला मॉनिटरींग केलं जात आहे. 

    चाईल्ड पोर्नोग्राफीचा रिपोर्ट कसा कराल

    चाइल्ड पोर्नोग्राफी विषयी रिपोर्ट करायचा असेल तर https://www.missingkids.org/gethelpnow/cybertipline या संकेतस्थळावर रिपोर्ट नोंदवता येता. चाईल्ड पोर्नोग्राफी इंटरनेटवर सर्च केली तरी गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. यामध्ये लहान मुलांना फसवलं जात. यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सायबर तज्ञ नीरज सोळंके यांनी सांगितले. 

     अपलोडिंग करणाऱ्यांची आयडी ब्लॉक

    चाईल्ड पोर्नोग्राफी डाऊनलोडिंग किंवा अपलोडिंग करणाऱ्यांची आयडी ब्लॉक केली जाते. असा प्रकार करणाऱ्यांचे सर्व डिटेल्स मिनिस्ट्री ऑफ होम दिल्ली येथे पाठवले जातात. प्रत्येक पोलीस स्टेशनपर्यंत विविध नोडल एजन्सीद्वारे ती माहिती पोहोचवली जाते. अशा कुठलाही प्रकार निदर्शनास आला तर सायबर विभागाशी नक्की संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 02442 -222333 असे आवाहन सायबर सेल पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी केले आहे.

    First published:

    Tags: Beed, Beed news, Crime