उस्मानाबाद, 1 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेचे नेते अजित पवार यांचं भाषण म्हणजे कार्यकर्त्यासाठी मेजवानीच असते. त्याचा प्रत्यय आज उस्मानाबादमधील सभेत आला आहे. अजित दादांनी आज तर उस्मानाबादमधील एका कार्यक्रमामध्ये भर मंचावर चक्क गाणं गायलं. अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांना एकामागून एक चिठ्ठ्या देण्यात आल्या. त्यावेळी घे रे त्याची चिठ्ठी म्हणत अजित पवारांनी मंचावर “चिठ्ठी आई है” हे गाणं गायलं. यावेळी कार्यकर्त्यांनीही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत अजित पवारांच्या गाण्याला प्रतिसाद दिला. अजित पवारांचा मूड पाहून कार्यकर्त्यांनी देखील एकामागेएक चिठ्या देण्यास सुरुवात केली. एका कार्यकर्त्यांने तर तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा वाद हा कोर्टात चालू असून तो सुरू करा, अशी मागणीच अजित पवार यांच्याकडे केली. या कार्यकर्त्याची मागणी बघत अजित पवार यांनी डोक्यावर हात मारून घेत अरे ते प्रकरण न्यायालयात प्रलिंबत असून ते काय माझ्या हातात आहे का? असा सवाल करत चक्क खिशात हात घातला. अजित पवार कागद काढून नेत्याला देण्याची नक्कल करत अरे काही काय मागण्या करता? काय डोस्क बिस्क हाय का नाही? असं पवार म्हणताच एकच हशा पिकला.
अजित दादांनी आज तर उस्मानाबादमधील एका कार्यक्रमामध्ये भर मंचावर चक्क गाणं गायलं #AjitPawar pic.twitter.com/zGQSBpcJfn
— News18Lokmat (@News18lokmat) October 1, 2022
( अमोल कोल्हे थेट अमित शाहांच्या भेटीला, पड्यामागे खरंच काही घडतंय? सुप्रिया सुळे म्हणतात…. ) अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय अजित पवार जितके रोखठोक आहेत तितकेच ते हळवेदेखील आहेत. त्यांच्या स्वभावातील या गुणांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा पडलेला बघायला मिळाला आहे. अजित पवारांचं कार्यकर्त्यांसोबत चांगलं नातं आहे. अजित दादा शिस्तप्रिय असल्याने त्यांच्यासमोर कार्यकर्ते शिस्तीचं पालन करताना दिसतात. याशिवाय अजित पवार अनेकदा दौरा करतात तेव्हा त्यांना कोणतीही गोष्टी खटकली तर ते संबंधित अधिकाऱ्यांना जाहीरपणे सुनावतात.