उस्मानाबाद, 26 ऑगस्ट : शिक्षण घेऊन नोकरी करणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र, यशस्वी शेती करून नाथवाडी गावच्या बाळकृष्ण साळुंखे (Balkrishna Salunkhe) तरुणाने गैरसमज मोडीत काढला आहे. बाळकृष्ण याने आधुनिक शेतीची कास धरत शेतात नवीन पिकाचा प्रयोग केला आहे. यातून लाखों रुपयांचा फायदा बाळकृष्णला मिळत असून एखाद्या अधिकारी एवढी कमाई सध्या बाळकृष्ण करतो आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळत आहेत. बाळकृष्ण साळुंखे हा तरुण प्रगतशील शेतकरी वर्षाकाठी 7 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न घेतो आहे. उस्मानाबाद जिल्हा हा बहुतेक दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील कळंब तालुका हा दुष्काळग्रस्त भाग आहे. अश्या दुष्काळग्रस्त भागाच्या ठिकाणी विदेशात फुलणारी ड्रॅगन फ्रूटची फळबाग बाळकृष्ण साळुंखे या तरुणाने फुलवली आहे. या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी बाळकृष्ण सांभाळतो. कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही जेमतेम नववी पास आणि दहावी नापास असे बाळकृष्णचे शिक्षण. ड्रॅगन फ्रूट बागेची लागवड करण्यापूर्वी बालकृष्णाने कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही. तरी देखील त्याने शेतीत प्रयोग केला. त्याने 1 एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूट फळबागेची लागवड केली. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यातून वर्षाकाठी 7 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. हेही वाचा-
कपिला’च्या डोहाळ जेवणाची चर्चा तर होणारच, अनोखा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे पाहा Photos
2018 मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. या फळबागेची लागवड 10 बाय 10 फूट अंतरावर केली. साळुंखे परिवाराला ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून चांगला नफा मिळू लागला आहे. दोन्ही ओळीतील अंतर 10 फुटाचे असल्यामुळे त्यामध्ये अंतर्गत पीक पद्धतीप्रमाणे सोयाबीन, उडीद या पिकांची पेरणी देखील केली आहे. या बागेची लागवड करण्यासाठी एकूण 4.5 लाख रुपये खर्च आला होता. विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रूट या फळाची माहिती बालकृष्णाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून मिळवली. एकदा या पिकाला फळ लागण्यास सुरूवात झाली की सहा महीने फळ मिळतंच राहते. हेही वाचा-
भेळ अशी की पाहताच तोंडाला सुटेल पाणी; ‘अंबिका’ने जपली 39 वर्षांची परंपरा, पाहा Photos
1200 ड्रॅगन फ्रूट रोपांची लागवड बालकृष्णाने एका एकरात एकूण 1200 रोपे लावली आहेत. यापैकी सर्व रोपे ही रेड-1200 रोपे आहेत. तोडणीपासून एका एकरात 6 ते 8 टनांचे उत्पादन निघून साधारण 6 ते 7 लाखापर्यंतचे उत्पन्न हाती येत असल्याचे शेतकरी, बाळकृष्ण साळुंखे (संपर्क क्रमांक- 7972460135 ) याने सांगितले. स्वतः विकतो माल बाळकृष्णची जमीन सोलापुर - धुळे महामार्गालगत आहे. महामार्गालगत असणारी बागपाहून अनेक प्रवासी ड्रॅगन फ्रूटची खरेदी करण्यासाठी येथे थांबतात. यामुळे या मालाला प्रति 200 रुपये असा दर मिळतो. दिवसाला 20 ते 22 किलो मालाची जागेवरून विक्री होत असल्याने बाळकृष्ण व साळुंखे परिवार समाधानी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.