उस्मानाबादमध्ये शिवसेनेला धक्का, बंडखोर नेत्याने अखेर हाती घेतला भाजपचा झेंडा

उस्मानाबादमध्ये शिवसेनेला धक्का, बंडखोर नेत्याने अखेर हाती घेतला भाजपचा झेंडा

हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 28 फेब्रुवारी : शिवसेनेचे माजी बंडखोर उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अजित पिंगळे यांची ओळख होती. मात्र प्रामाणिक कार्य करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत पिंगळे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक  लढवली होती.

अजित पिंगळे यांनी आता शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काल मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकुर, तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाअध्यक्ष नितीन काळे हे उपस्थित होते.

निवडणुकीनंतर पिंगळे सेनेत राहावेत यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केला होता, अशी चर्चा होती. त्यातच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेत अजित पिंगळे यांना यांचा भाजपप्रवेश घडवून आणल. त्यामुळेच हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. पिंगळे यांच्या प्रवेशामुळे भाजपला उस्मानाबाद कळंब मतदार संघात मोठे बळ मिळणार आहे.

ओमराजे विरुद्ध राणा पाटील संघर्ष

पद्मसिंह पाटील आणि पवनराजे हे चुलत बंधू सुरुवातीला एकत्र राजकारण करत होते. मात्र नंतरच्या काळात या दोन भावांमध्ये टोकाचे मतभेद झाले आणि दोघे वेगळे झाले आणि डॉ. पाटील आणि पवनराजे यांच्यात उस्मानाबादमध्ये प्रचंड राजकीय संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे यांची अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

अकोल्यात शिवसेना नगरसेवकाचा राडा, सभेत खुर्च्यांची तोडफोड

पाटील-पवनराजे संघर्षानंतर त्यांच्या दुसऱ्या पिढीतही हा राजकीय संघर्ष सुरू आहे. पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे आणि डॉ. पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह यांच्यात राजकीय संघर्षानं टोक गाठलं आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे विरुद्ध राणाजगजितसिंह यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत ओमराजेंना विजय खेचून आणला होता.

First published: February 28, 2020, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading