हृदयद्रावक! मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं; नांदेडमधील मजुराच्या मुलीनं केली आत्महत्या

कोरोनाच्या संकटकाळात देशातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचा (Online education) पर्याय अवलंबला आहे. पण यामुळे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांमधील डिजिटल दरी (Digital Gap) स्पष्टपणे दिसून आली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइल न मिळाल्यानं मजुराच्या मुलीनं आत्महत्या केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात देशातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचा (Online education) पर्याय अवलंबला आहे. पण यामुळे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांमधील डिजिटल दरी (Digital Gap) स्पष्टपणे दिसून आली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाइल न मिळाल्यानं मजुराच्या मुलीनं आत्महत्या केली आहे.

  • Share this:
    नांदेड, 18 जून: भारतात कोरोना विषाणूचा (Corona virus) शिरकाव झाल्यापासून देशातील शिक्षण व्यवस्थेचे (Education system) बारा वाजले आहे. अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. दरम्यानच्या काळात देशातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचा (Online education) पर्याय अवलंबला. पण यामुळे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांमधील डिजिटल दरी (Digital Gap) स्पष्टपणे दिसून आली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांकडे स्मार्ट फोन आणि इंटरनेट (Lack of mobile and internet) नसल्यानं त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. अशातच नांदेडमधील मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या  (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइलची मागणी करूनही मोबाइल न मिळल्यानं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. तिनं 16 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना नायगाव शहरातील फुलेनगर येथील असून आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव बुद्धशी प्रकाश पोटफोडे आहे. बुद्धशी सध्या अकरावीला शिकत होती. तिला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवण्यासाठी तिला अभ्यासात मागं पडायचं नव्हतं. त्यामुळे तिनं आपल्या आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. घरच्यांनीही लवकरत मोबाईल घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. तोपर्यंत मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. हेही वाचा- 'जीवनाचा शेवट करतेय, प्लिज कारण नका विचारू', हृदयद्रावक VIDEO शेअर करत तरुणीची आत्महत्या मृत बुद्धशीचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह चालवतात. बुद्धशीला दोन भाऊ देखील आहे. हे दोघंही मोलमजुरी करून आपलं शिक्षण घेत होते. 'आम्ही तिला मोबाईल घेऊनच देणार होतो, पण त्याआधीच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं तिचा भाऊ अमोलनं सांगितलं.' या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published: