Home /News /maharashtra /

'जीवनाचा शेवट करतेय, प्लिज कारण नका विचारू', हृदयद्रावक VIDEO शेअर करत तरुणीची आत्महत्या

'जीवनाचा शेवट करतेय, प्लिज कारण नका विचारू', हृदयद्रावक VIDEO शेअर करत तरुणीची आत्महत्या

Suicide in Latur: लातूरच्या (Latur) एका खाजगी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने एका व्हिडीओ (Video) शेअर करत आत्महत्या (Suicide) केली आहे. या व्हिडीओमधून तरुणीने आपल्या वेदना सोशल मीडियावर मांडल्या आहेत.

  लातूर, 13 जून: लातूरच्या (Latur) एका खाजगी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने एका व्हिडीओ (Video) शेअर करत आत्महत्या (Suicide) केली आहे. या व्हिडीओमधून तरुणीने आपल्या वेदना सोशल मीडियावर मांडल्या आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयुष्याच्या परिक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत या तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलीस तपास करत आहेत. संबंधित आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव सोनू शेख (Sonu shekh suicide) असून ती लातूरमधील एका खाजगी महाविद्यालयात बी ए च्या द्वितीय वर्षाला शिकत होती. मृत सोनू शिक्षण घेत असतानाच पार्ट टाइम जॉब देखील करत होती. आता हे सगळं आता मला सहन होतं नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असंही सोनूनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. “जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे, की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल” असं सोनू आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by S.Soni 🐥 (@786_lil_cutie)

  हे ही वाचा-'कोणी रडलं तर...'; भावनिक WhatsApp स्टेटस ठेवून 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या सोनूच्या आईला कोणीतरी फोनवर बोलत होतं, यामुळे त्यांच्यात भांडणही झालं होतं. यातूनच सोनुने टोकाचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटचा शोध घेतला जात आहे. सोबतचं मोबाईलमध्ये आणखी काही आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. तिची आई कामावर गेली होती, तर वडील विभक्त राहत असल्याने तेही घरात नव्हते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Latur, Suicide, Video viral

  पुढील बातम्या