भीषण आगीमुळे घरात गुदमरून मुलाचा मृत्यू; आई, बाबा व ताई होरपळले

भीषण आगीमुळे घरात गुदमरून मुलाचा मृत्यू; आई, बाबा व ताई होरपळले

इमारतीच्या खालच्या मजल्याला भीषण आग लागल्याने घरात गुदमरून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे

  • Share this:

औरंगाबाद,27 फेब्रुवारी: इमारतीच्या खालच्या मजल्याला भीषण आग लागल्याने घरात गुदमरून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाची आई, बाबा आणि बहीण आगीत गंभीर होरपळले आहेत. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शहरातील उल्कानगरी भागात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संस्कार शामसुंदर जाधव (वय-14) असे मृत मुलाचे नाव आहे तर शामसुंदर बाबासाहेब जाधव (वय-45), सविता शामसुंदर जाधव (वय-39), संस्कृती शामसुंदर जाधव (वय-19) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुट्टीवर आलेल्या जवानाने केली पत्नीची हत्या, दोन वर्षांपूर्वी झाला होता प्रेम विवाह

याबाबत मिळालेली माहिती अशी की,मुळचे पैठण तालुक्यातील करंजखेडा येथील शामसुंदर जाधव यांचा एलईडी व सोलर ऊर्जाच्या उपकरण विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी अविनाश पाठक यांच्या सहा खोल्यांच्या बंगल्यात जाधव कुटुंबीय भाडेतत्वावर राहतात. बुधवारी रात्री कुटुंबय झोपी गेले असताना इमारतीच्या खालच्या मजल्यावर शॉर्टसर्किट होऊन घराच्या पाठीमागील खोलीत अचानक भीषण आग लागली. त्यामुळे एलईडी बल्ब आणि सोलर ऊर्जाच्या उपकरणांनी पेट घेतला. त्यामुळे परिसरात आणि घरात धुराचे लोळ पसरले.

धुराने जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबियांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. धुरापासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आणि खिडक्या आतून लावण्यात आल्या. मात्र, तोपर्यंत धुराने विळखा घातला होता. शॉर्टसर्किटमुळे घरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबियांनी आरडा-ओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकूण पाठीमागील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या इतर कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलासह जवाहरनगर पोलिसांना कळवण्यात आली.

वाट चुकलेल्या महिलेवर दोन तासांमध्ये 3 नराधमांनी केला बलात्कार

अग्निशमन दल दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल दाखल झाल्यावर जाधव कुटुंबीयांच्या बचावासाठी दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यासाठी शिडीचा वापर करण्यात आला. या मजल्यावरील खिडकी आणि दरवाजा तोडला. जाधव कुटुंबिय बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. कुटुंबातील सर्व सदस्यांना तात्काळ खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संस्कारला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हिंसाचाराने वेढलेल्या दिल्लीत माणुसकीचं दर्शन, जीव धोक्यात घालून रैसुल इस्लाम यांनी केला औषध पुरवठा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 02:32 PM IST

ताज्या बातम्या