Home /News /maharashtra /

साताऱ्यात Omicron चा शिरकाव, फलटण शहरात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण

साताऱ्यात Omicron चा शिरकाव, फलटण शहरात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण

Coronavirus news updates: परदेशातून साताऱ्यात आलेल्या तिघांना कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे.

सातारा, 18 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant of Coronavirus) सर्वांचीच चिंता वाढवली आहे. त्यातच ओमायक्रॉन आता महाराष्ट्रात (Omicron in Maharashtra) झपाट्याने पसरत असल्याचं दिसत आहे. परदेशातून साताऱ्यात आलेल्या तिघांना आता ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. (Omicron in Satara district of Maharashtra) सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात परदेशातून चार जण आले होते. या चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर या चौघांचेही स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आता आला असून तिघांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे. डोंबिवलीमध्ये पुन्हा आढळला Omicron चा रुग्ण डोंबिवलीमध्ये (Dombivali omicron) पुन्हा एक ओमायक्रॉन ग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. तर पुण्यामध्ये एकाच दिवसात 6 रुग्ण आढळून आले आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. वाचा : नवी मुंबईतील 'त्या' शाळेतील आणखी दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह राज्यात 17 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनचे 8 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6, मुंबईमध्ये 1 तर कल्याण डोंबिवली 1 रुग्ण आढळला आहे. पुण्यातील 2 रूग्ण हे दुबई रिटर्न तर 2 त्यांच्या संपर्कात आलेले आहे. तर मुंबईचा रूग्ण 1 अमेरिकेहून परतलेला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये नायजेरिया परदेशी पर्यटक हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण 7 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर सर्व लोकांचे rt-pcr नमुने घेण्यात आले. सदर नमुने 12 डिसेंबरला पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. यासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आलेले आहे व पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहे अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे. या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिनोम सिक्वेसिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Satara

पुढील बातम्या