मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : डोंबिवलीमध्ये पुन्हा आढळला Omicron चा रुग्ण, राज्यात रुग्णांची संख्या 40 वर

BREAKING : डोंबिवलीमध्ये पुन्हा आढळला Omicron चा रुग्ण, राज्यात रुग्णांची संख्या 40 वर

राज्यात आज ओमायक्रॉनचे 8 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6, मुंबईमध्ये 1 तर कल्याण डोंबिवली 1 रुग्ण आढळला आहे.

राज्यात आज ओमायक्रॉनचे 8 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6, मुंबईमध्ये 1 तर कल्याण डोंबिवली 1 रुग्ण आढळला आहे.

राज्यात आज ओमायक्रॉनचे 8 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6, मुंबईमध्ये 1 तर कल्याण डोंबिवली 1 रुग्ण आढळला आहे.

डोंबिवली, 17 डिसेंबर : राज्या कोरोनाचा (corona) नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डोंबिवलीमध्ये (Dombivali omicron) पुन्हा एक ओमायक्रॉन ग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. तर पुण्यामध्ये एकाच दिवसात 6 रुग्ण आढळून आले आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.

राज्यात आज ओमायक्रॉनचे 8 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 6, मुंबईमध्ये 1 तर कल्याण डोंबिवली 1 रुग्ण आढळला आहे.  पुण्यातील 2 रूग्ण हे दुबई रिटर्न तर 2 त्यांच्या संपर्कात आलेले आहे. तर मुंबईचा रूग्ण 1 अमेरिकेहून परतलेला आहे.

तर कल्याण डोंबिवलीमध्ये नायजेरिया परदेशी पर्यटक हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी व  नारायणगाव येथील एकूण ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर सर्व लोकांचे rt-pcr नमुने घेण्यात आले. सदर नमुने १२ डिसेंबरला  पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते.सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. यासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आलेले आहे व पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहे अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे. या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिनोम सिक्वेसिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

 

डोंबिवलीतील रुग्णाची ओमायक्रॉनवर मात

तर दुसरीकडे, केडीएमसी क्षेत्रातील दुसऱ्या ओमायक्रॉन बाधित रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. महत्वाची बाब म्हणजे, या रुग्णाचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवल्या नंतर ते पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल हा आज सायंकाळी प्राप्त झाला होता. विलगिकरण कक्षात असल्यापासून त्याला कोणतीही लक्षणे नव्हती, उपचाराअंती त्यांचे RTPCR निगेटिव्ह आल्याने त्याला आज दुपारीच  डिस्चार्ज देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

राज्यात रुग्णांची संख्या 40 वर

दरम्यान, महाराष्ट्रात आता रुग्णांची 40 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र हे ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

First published:

Tags: Corona, Dombivali, Pune