मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रामनाथ कोविंद यांचा महाराष्ट्र दौरा, तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर

रामनाथ कोविंद यांचा महाराष्ट्र दौरा, तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) येत आहेत. तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत.

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) येत आहेत. तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत.

आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) येत आहेत. तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत.

रायगड, 06 डिसेंबर: स्वराज्याची राजधानी किल्ले (Fort Raigad) रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) येत आहेत. तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत.

याआधी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981साली किल्ले रायगडावर आल्या होत्या. त्यावेळा त्यांनी राज सदरेत मेघ डंबरी उभारण्याची सूचना केली होती. त्यानूसार मेघ डंबरी 1985 साली बांधून पूर्ण झाल्यावर तिच्या लोकार्पण सोहळ्यास तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग किल्ले रायगडावर आले होते. त्यानंतर आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येत आहेत. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं.

हेही वाचा- पुण्यात नुकतेच परदेशातून 438 नागरिक परतले; महापौरांचं मोठं आवाहन

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर येणार असल्यामुळे किल्ले रायगड आणि परिसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी विविध स्तरांवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई विमानतळावरून भारतीय वायूदलाच्या MI17 हेलिकाँप्टरमधून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावात निर्माण केलेल्या हॅलिपॅडवर उतरतील. त्यानंतर रोप वेच्या माध्यमातून राष्ट्रपती किल्ले रायगडावर पोहोचतील. किल्ले रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर्वात प्रथम राज सदरेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मानाचा मुजरा करून अभिवादन करतील. त्यानंतर रायगड किल्याची पहाणी करत होळीच्या माळावर राष्ट्रपती येतील. तिथेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अभिवादन करतील.

त्यानंतर राष्ट्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर वंदन करण्यासाठी जाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या किल्ले रायगड दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि संभाजीराजे छत्रपती असणार आहेत.

चोख बंदोबस्त तैनात

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. पर्यटकांना आजूबाजूच्या परिसरातही प्रवेश नाकारण्यात येईल. पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आलीय. प्रशासनाकडून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील तयारीची पाहणी केली.

First published:
top videos

    Tags: President ramnath kovind