जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'कोण आला रे...' सुषमा अंधारेंना अडवलं, आता मुक्ताईनगरमध्ये होणार उद्धव ठाकरेंची सभा!

'कोण आला रे...' सुषमा अंधारेंना अडवलं, आता मुक्ताईनगरमध्ये होणार उद्धव ठाकरेंची सभा!

जळगावमध्ये महाप्रबोधन सभा घेण्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला पण आता..

जळगावमध्ये महाप्रबोधन सभा घेण्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला पण आता..

जळगावमध्ये महाप्रबोधन सभा घेण्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला पण आता..

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 05 नोव्हेंबर : जळगावमध्ये महाप्रबोधन सभा घेण्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा रद्द करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होता. आता मुक्ताईनगरमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुक्ताईनगरमध्ये सभा होणार आहे. शिवसेनेकडून शिंदे गटाला आता ओपन चॅलेंज देण्यात आलं आहे. जळगावमध्ये सभा घेण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. सभेला परवानगी नाकारल्यानंतर सभा घेण्याचा पवित्रा घेऊनही पोलिसांनी सुषमा अंधारे यांना नजर कैदेत ठेवून मुक्ताईनगरकडे जाण्यास रोखले होते. त्यामुळे मुक्ताईनगरची महाप्रबोधन सभा होऊ शकली नाही त्यामुळे आता मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचा ठाकरे गटाने निर्णय घेतला आहे. ((माझं काम फत्ते झालं.. मुक्ताईनगरची सभा रद्द झाल्यानंतरही सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?) सुषमा अंधारे यांची मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन सभेला परवानगी नाकारल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची मुक्ताईनगर मध्ये सभा होणार आहे. लवकरच मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली. लवकरच मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होईल, ती कुठे आणि कधी होणार या सभेची तारीख त्यानुसार घोषित करण्यात येणार आहे असंही, संजय सावंत यांनी स्पष्ट केलं. ( आदित्य ठाकरे, सुषमा अंधारेंची सभा रद्द; शिवसेना उपनेत्याचा गृहमंत्री फडणवीसांवर जोरदार प्रहार ) दरम्यान, मुक्ताईनगरची सभा रद्द झाल्याने झालेल्या गोंधळानंतर सुषमा अंधारे जळगाव वरून परळीकडे रवाना झाल्या आहे.

News18लोकमत
News18लोकमत

महा प्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात जळगाव मधून एक नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर तीन दिवस जळगाव जिल्ह्यातील धरणगाव,पाचोरा आणि चोपडा या ठिकाणी सभा झाल्या. मात्र चार तारखेला महाप्रबोधन यात्रेच्या चौथ्या दिवसाची सभा जळगाव जिल्ह्यात कलम 144 लागू झाल्याने रद्द करण्यात आली. यामुळे यापुढे मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील व मंत्री गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त करण्याची गरज नसून येत्या काही दिवसात याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः सभा घेणार असून आता मी पूर्णपणे जिंकली आहे आणि आता कितीही जिंकण्याचा आव आणला तरी मंत्री गुलाबराव पाटील तुम्ही पैलवान म्हणून सपशेल अपयशी ठरला आहात, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी विरोधकांना टोला लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात