जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO - मुंबईच्या कुशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार आहे

VIDEO - मुंबईच्या कुशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं सांस्कृतिक केंद्र; नीता अंबानींचं NMACC लवकरच होणार आहे

नीता अंबांनींचं NMACC

नीता अंबांनींचं NMACC

देश-विदेशातील कलाकारांसाठी नीता अंबानी यांच्या नावे मुंबईत सांस्कृतिक केंद्राचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 डिसेंबर : भारतातील सर्वात आधुनिक, प्रतिष्ठित आणि जागतिक दर्जाचे सांस्कृतिक केंद्र पदार्पणासाठी सज्ज झालं आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या फाऊंडर चेअरपर्सन नीता अंबानी यांनी मुंबईच्या कुशीत हे सांस्कृतिक केंद्र वसवलं आहे. नीता अंबानी यांच्या नावानेच हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे.  नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजे NMACC चं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे. या सेंटरची वेबसाइट लाँच झाली आहे. NMACC हे नीता अंबानी यांचं ड्रीम प्रोजेक्ट. ऑक्टोबर 2022 मध्ये इशा अंबानीनेच आपल्या आईच्या नावाने हे सांस्कृतिक केंद्र सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. आईचं कल्चरवर असलेलं प्रेम पाहतात तिच्या नावानेच हे केंद्र सुरू करण्यात आलं.  स्थानिक कला, कलाकार, कलाकार आणि निर्मात्यांसाठी यूएस किंवा युरोपमध्ये उपलब्ध असलेल्या केंद्रांपेक्षा उत्तम असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र भारतात उपलब्ध करून देण्याचं नीता यांचं लक्ष्य. हे वाचा -  Home loan: कोणत्या बँकेनं किती वाढवले व्याजदर, पाहा PHOTO इशा अंबानी म्हणाली, “माझी आई बिझनेसवुमन, शिक्षणतज्ज्ञ आणि परोपकारीही आहे. पण तिची सर्वात खरी ओळख म्हणजे ती एक डान्सर आहे. गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षे ती दररोज डान्स करते. कलेसाठी तिने स्वतःचा वेळ देताना मी पाहिलं आहे. तिचे कलेची आवड अतुलनीय आहे. भारतातील वारसा आणि संस्कृतीसाठी एक व्यासपीठ देण्याची तिची इच्छा होती. गेल्या काही वर्षांत मी आणि माझ्या आईने आमच्या टीमसह मिळून हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनत घेतली. "

जाहिरात

मुंबईच्या बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हे सेंटर आहे. चार मजली इमारत आहेत. ज्यात 16000  स्केवअर फिट एक्झिबिशन स्पेस आणि तीन थिएटर्स आहेत. त्यापैकी सर्वात मोठं थिएटर हे २००० सीट्सचं आहे. हे वाचा -  लग्नसराईत सर्वात जास्त मागणी असलेल्या गुलाबाची शेती कशी करायची? “भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करणे ही आमची वचनबद्धता आहे. आमचं हे व्यासपीठ भारत आणि जगातील लोकांना एकत्र आणेल. त्यांच्या प्रतिभेची जोपासना करेल, त्यांना प्रेरणा देईल, अशी आशा मला आहे”, असं नीता अंबानी म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात