RBI ने रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांनी आपलं व्याजदर वाढवलं आहे. बँक ऑफ बडोदाने व्याजदरात वाढ केली आहे. यासोबत काही सरकारी बँकांनी देखील व्याजदर वाढवले आहेत.
बँक ऑफ बडोदाने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार कर्जांसाठीचा किमान व्याजदर ८ डिसेंबरपासून ८.८५ टक्के करण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडयाने 9.10 टक्के व्याजदर केला आहे. एक वर्षाआधी हा व्याजदर 8.15 टक्के होता. हा दर 7 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.
इंडियन ओवरसीज बँकेनं 9.10 टक्के व्याजदर केला आहे. हा व्याजदर 10 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.