नवी दिल्ली, 1 एप्रिल : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची घोषणा केली आहे. राज्यातील पायाभूत सुविधांचा कणा असलेल्या रसत्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांसाठी हा निधी दिला जाणार आहे. राज्यातील विविध मार्गांच्या कामासाठी एकूण 2780 कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला आहे. नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. एकापाठोपाठ tweet करत गडकरी यांनी कोणत्या कामासाठी किती निधी जाहीर केला जात आहे याची माहिती दिली. हे ट्विट करताना गडकरी यांनी #PragatiKaHighway अशा प्रकारचा हॅशटॅग वापरला आहे. देशाच्या प्रगतीचा महामार्ग रुंदावत असल्याचे संकेत गडकरींनी या माध्यमातून दिलेत. कोणत्या रस्त्यासाठी किती निधी? - राष्ट्रीय महामार्ग 361एफ वरील परळी ते गंगाखेड या मार्गासाठी 224.44 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 वरील आमगाव ते गोंदिया मार्गाच्या विस्तारीकरणासाठी 239.24 कोटींच्या निधीला मंजुरी. - नांदेड जिल्ह्यात येसगी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 63 वरील मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188.69 कोटींचा निधी मंजूर. - नागपूरमध्ये आरटी चौक ते नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत उड्डाणपूल आणि राष्ट्रीय महामार्ग 53 वर वाडी/एमआयडीसी जंक्शन 4 पदरी उड्डाण पूल यांच्या कामासाठी 478.83 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. वाचा - ठेवीदारांना मोठा दिलासा, PPF सह व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला मागे - राष्ट्रीय महारमार्ग क्रमांक 753 वर 28.2 किलोमीटरच्या रस्त्यासह तिरोरा गोंदिया राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 288.13 कोटींच्या निधीला मंजुरी. - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166जी वरील तरेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर विस्तारीकरणासाठी 167 कोटींचा निधी मंजूर.
Upgradation and rehabilitation of section of NH 361F from Parli to Gangakhed has been approved with a budget of 224.44 Cr. #PragatiKaHighway
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 1, 2021
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वर तिरोरा-गोंदिया भागामध्ये दोन पदरी मार्गासाठी 282 कोटींच्या निधीला मंजुरी - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752आय वरील वाटूर ते चारठाण परिसरात दोन लेनच्या विस्तारीकरण आणि पुनर्बांधणीच्या कामासाठी 228 कोटींच्या निधीला मंजुरी. - गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 353सी वरील 262 किमी ते 321 किमी चे विस्तारीकरण आणि 16 लहान मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी 282 कोटींच्या निधीला मंजुरी - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166ई वर गुहार-चिपळून मार्गावर विस्तारीकरणासाठी 171 कोटींचा निधी मंजूर. - जळगाव-भद्रावन-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753जे वरील रसत्याच्या चार पदरी विस्तारीकरणाच्या कामाला 252 कोटींच्या निधीसह मंजुरी
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीग गडकरी यांनी अनेकदा संपूर्ण देशातील रस्ते आपण उत्तम बनवणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये देशातील रस्त्यांचे जाळे झपाट्याने फैलावत असल्याचंही पाहायला मिळालं आहे. राज्यातही नितीन गडकरी यांनी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. त्यात या कामांमुळे आणखी भर पडली आहे.