मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानला 'या' सेलिब्रेटींकडून मिळाल्या महागड्या भेटवस्तू; कतरिना ते शिल्पा या अभिनेत्रींचा LIST मध्ये समावेश

सलमान खानला 'या' सेलिब्रेटींकडून मिळाल्या महागड्या भेटवस्तू; कतरिना ते शिल्पा या अभिनेत्रींचा LIST मध्ये समावेश

Salman Khan

Salman Khan

बॉलिवूड (Bollywood) दबंग सलमान खानने (Salman Khan 56 th Birthday) नुकताच आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. पनवेलच्या फार्म हाऊसवर झालेल्या सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29  डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)   दबंग सलमान खानने   (Salman Khan 56 th Birthday)   नुकताच आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. पनवेलच्या फार्म हाऊसवर झालेल्या सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. तर अनेकांनी सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो शेअर करून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सलमान नेहमीच सर्वांना भेटवस्तू देत असतो. मात्र त्याच्या वाढदिवसाचं निमित्त साधत कतरिना कैफ  (Katrina Kaif) ते शिल्पा शेट्टी   (Shilpa Shetty)  या अभनेत्रींनी त्याला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफने त्याला तब्बल 3 लाखाचा सोन्याचा ब्रेसलेट भेट म्हणून दिला आहे. तर जॅकलिन फर्नांडिसने 12 लाखांचा घड्याळ भेट केला आहे. फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीने आपल्या या खास मित्राला जवळजवळ 16 ते 17 लाख किंमतीचा डायमंड ब्रेसलेट भेट दिला आहे. या सर्वांच्या पुढे जात अभिनेता अनिल कपूर यांनी सलमानला 29 लाखांचा लेदर जॅकेट भेट केला आहे. तर संजय दत्तने सलमान खानला 8 लाखांचा घड्याळ दिला आहे. संजय आणि सलमान खान फार जुने मित्र आहेत.

कुटुंबातील सदस्यांनी दिल्या या भेटवस्तू-

सलमान खानला बॉलिवूडचा भाईजान म्हटलं जातं. सलमान नेहमीच आपल्या उदार व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो. सलमान खानने अनेक कलाकारांना किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना महागड्या भेटवस्तू दिल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं आहे. त्यामुळे सलमानला त्याच्या वाढदिवसाला कोणाकडून काय भेट मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. आपण बॉलिवूड कलाकारांनी दिलेल्या भेटवस्तू पहिल्या, परंतु सलमानचे भाऊ-बहीणसुद्धा यामध्ये मागे नाहीत. त्याच्या बहीण भावांनी त्याला फारच सुंदर वस्तू भेट केल्या आहेत.

(हे वाचा:PHOTOS: आलिया-रणबीर सीक्रेट डेस्टिनेशनवर करणार New Year सेलिब्रेशन)

बहीण अर्पिता खानने सलमानला 17 लाखांचा रोलेक्स घड्याळ भेट दिला आहे. तर अभिनेता अरबाज खान आणि सोहेल खानने आपल्या भावला 25लाखाची बीएमडब्ल्यू आणि तब्बल 8 कोटींची ऑडी दिल्याचं वृत्त आहे. सलमान खानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन झालं. यावेळी सलमान खानने आपली भाची आयतसोबत वाढदिवसाचा केक कापला. सलमानला सोशल मीडियावरून प्रचंड शुभेच्छा दिल्या जात होत्या.

.

First published:

Tags: Entertainment, Salman khan