मराठी बातम्या /बातम्या /विदेश /येडा की खुळा? 14 वेळा घेतली कोरोनाची लस, केवळ 4 हजारांसाठी जिवाशी खेळ

येडा की खुळा? 14 वेळा घेतली कोरोनाची लस, केवळ 4 हजारांसाठी जिवाशी खेळ

केवळ काही पैसे मिळवण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे तब्बल 14 डोस टोचून घेतले. त्यानंतर त्याने अशी एक चूक केली, ज्यामुळे पोलिसांनी त्याला पकडलं.

केवळ काही पैसे मिळवण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे तब्बल 14 डोस टोचून घेतले. त्यानंतर त्याने अशी एक चूक केली, ज्यामुळे पोलिसांनी त्याला पकडलं.

केवळ काही पैसे मिळवण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीनं कोरोना प्रतिबंधक लसीचे तब्बल 14 डोस टोचून घेतले. त्यानंतर त्याने अशी एक चूक केली, ज्यामुळे पोलिसांनी त्याला पकडलं.

जकार्ता, 30 डिसेंबर: केवळ पैशांसाठी (For money) इंडोनेशियातील (Indonesia) एका व्यक्तीनं तब्बल 14 वेळा कोरोनाची लस (14 anti covid vaccines) घेतल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. कोरोनाची लस घेणं हे अनेक संस्थांमध्ये बंधनकारक (Mandatory) करण्यात आलं आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी, विमान प्रवासासाठी आणि परदेशी जाण्यासाठीदेखील कोरोनाची लस घेतलेली असणं बंधनकारक आहे. मात्र आजही अनेक नागरिकांचा कोरोनाची लस घेण्याला विरोध आहे. काहींना या लसीमुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होईल, अशी भिती वाटते, तर काहींना कोरोना व्हायरसचा विनाकारण बाऊ केला जात असून लस घेण्याची गरजच नाही, असं वाटतं. अशा लोकांसाठी ही व्यक्ती काम करत होती.

घेतले 14 डोस

इंडोनेशियात राहणारा अब्दुल रहीम नावाचा तरुण अशा लोकांना भेटायचा, ज्यांना लस घेण्याची इच्छा नाही. त्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करून तो स्वतः लस घ्यायचा आणि त्यांच्या नावे मिळालेलं सर्टिफिकेट त्यांना देण्यासाठी तो 4 हजार रुपये घ्यायचा. या कामासाठी तो 500 ते 4000 रुपयांपर्यंत पैसे घेत होता. स्वतःच्या नावे त्याने लसींचे दोन डोस घेतले होतेच. शिवाय इतर 6 व्यक्तींसाठीदेखील त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस टोचून घेतले आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं.

हे वाचा- दोन गर्भाशय, दोन्हीत एकाच वेळी बाळ; प्रेग्नंट महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

अशी झाली पोलखोल

अब्दूल रहीम जोपर्यंत लपून छपून हा धंदा करत होता, तोपर्यंत ते कुणाच्याच लक्षात आलं नाही. मात्र एक दिवस त्याने एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला. ज्यांना कुणाला लस न घेता त्याचं सर्टिफिकेट हवं असेल, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असं त्याने म्हटलं. त्यानंतर ही क्लिप पोलिसांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी रहीमला अटक केली. रहिमनं आतापर्यंत केलेल्या सर्व बोगस लसीकरणाची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याच्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. इंडोनेशियात रहिमसारखे अनेकजण अशा प्रकारचा गोरखधंदा करण्यात गुंतले असल्याचंही या निमित्ताने समोर आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Crime, Indonesia, Police