जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट; अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढणार?

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट; अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढणार?

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट; अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढणार?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मैदानात उतरले आहेत. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह एकूण  75 जणांना दोन वर्षांपूर्वी क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणात नव्यानं तपास सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेली या प्रकरणाची सुनावणी आज 3 डीसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.   काय आहे नेमकं प्रकरण?  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण 75 जणांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेनं क्लीन चीट  दिली होती. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणाचा नव्यान तपास सुरू करण्याची परवानगी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेकडून मागण्यात आली आहे. हेही वाचा :   Aditya Thackeray : शिंदे सरकारचा ठाकरे गटाला मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्ट्सना स्थगिती अण्णा हजारो मैदानात  दरम्यान या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांच्या वकिलांनी EOW चा C समरी रिपोर्ट अर्थात  क्लोजर रिपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. हा रिपोर्ट रद्द केल्याशिवाय, EOW पुन्हा नव्यानं कसा तपास करणार ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिखर बँकेंच्या सर्व संचालकांविरोधात प्रोसेस इश्यू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. हेही वाचा :  Raju Shetti : पश्चिम महाराष्ट्रात उसदरासाठीचे आंदोलन पेटलं, राजू शेट्टींचा सरकारला अल्टीमेटम अर्जावर म्हणण सादर करण्याचे आदेश   या प्रकरणात अण्णा हजारो यांच्यासह माणिकराव जाधव, किसन कवाद, शालिनीताई पाटील यांनी ही मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान आता न्यायालयानं  EOW ला अण्णा हजारे यांच्यासह चौघांच्या अर्जावर म्हणण सादर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.  या प्रकरणाची सुनावणी आता  3 डीसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात