खाकी वर्दीतला 'क्रूर' चेहरा आला समोर, 'News18 लोकमत'च्या प्रतिनिधीला बेदम मारहाण

खाकी वर्दीतला 'क्रूर' चेहरा आला समोर, 'News18 लोकमत'च्या प्रतिनिधीला बेदम मारहाण

वार्तांकनासाठी गेलेले 'न्यूज18 लोकमत'चे हिंगोलीचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांना एका पोलिस उपनिरीक्षकाने बेदम मारहाण केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च: आपण सगळे 'कोरोना व्हायरस'रुपी महाभयंकर संकटाचा सामना करत आहोत. या काळात पोलिसांच्या कामगिरीचं कौतूक होत आहे. त्यांना सहकार्य करा, असं आवाहन केलं जात आहे. मात्र, हिंगोलीस पोलिसांचा क्रूर चेहरा समोर आला आहे. वार्तांकनासाठी गेलेले 'न्यूज18 लोकमत'चे हिंगोलीचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांना एका पोलिस उपनिरीक्षकाने बेदम मारहाण केली आहे. यात गंभीर जखमी झालेले कन्हैय्या यांच्यावर सध्या हिंगोलीतील एका हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरु आहेत.

हेही वाचा..घरभाडं मागितलं तर 2 वर्षांचा तुरुंगवास, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

कानशिलावर पिस्तूल रोखलं..

कन्हैया खंडेलवाल हे वार्तांकनासाठी जात असताना रस्त्यावर पोलिस सामान्य नागरिकांनी मारहाण करत होते. सामान्यांना मारहाण करु नका, असे शासनाचे आदेश असताना कन्हैया यांनी पोलिसांना जाब विचारला. याचा राग आल्याने आमच्याविरोधात बातम्या करतो काय, असं म्हणत एपीआय चिंचोळकर यांनी कन्हैया यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखलं. आता तुला जिवंत ठेवणार नाही. माझे कुणीच काही करणार नाही, म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. रस्त्यावर बेदम मारहाण करून पोलिस थांबले नाहीत. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथंही मारहाण केली.

कन्हैया यांच्यावर पोलिसांनी केलेल्या भ्याड हल्ल्यांचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. सरकारने अशा मस्तवाल पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि लेखणीला न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

हेही वाचा...महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे तरुण बळी, एकाच दिवसात घेतला दोघांचा जीव

First published: March 29, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading