मुंबई, 29 मार्च : वयस्कर व्यक्तींना कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका अधिक असल्याचं म्हटलं जातं आहे, मात्र या कोरोनाव्हायरसने महाराष्ट्रात (Maharashtra) 2 तरुणांचा जीव घेतला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता 8 झाला आहे, तर राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 203 वर पोहोचली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात कोरोनाव्हायरसचे 22 नवे रुग्ण आढळून आलेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघंही मृत तरुण आहेत. हे वाचा - कोरोनाने विदर्भात घेतला पहिला बळी, बुलडाण्यात 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू मुंबईत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. श्वास घेण्यात समस्या जाणवत असल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत्यूनंतर तिच्या चाचणीचे रिपोर्ट आले, ज्यामध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. शिवाय बुलडाण्यातही 45 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विदर्भातील कोरोनाव्हायरसचा हा पहिला बळी आहे. या व्यक्तीला मधुमेह होता. या दोन्ही मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाव्हायरसच्या मृतांचा आकडा 8 झाला आहे. हे वाचा - लॉकडाऊन संपल्यानंतर ‘कोरोना’च्या उद्रेकाची शक्यता, तज्ज्ञांनी दिली धोक्याची घंटा शिवाय राज्यात आज मुंबईत 10, पुण्यात 5, नागपुरात 3, अहमदनगरमध्ये 2, सांगली आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक असे एकूण 22 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यात एकूण 203 रुग्ण आहेत. त्यापैकी 35 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण जिल्हा रुग्ण मृत्यू मुंबई 85 06 पुणे (शहर आणि ग्रामीण) 37 00 सांगली 25 00 ठाणे (विभागातील महापालिका) 23 01 नागपूर 14 00 यवतमाळ 04 00 अहमदनगर 05 00 सातारा 02 00 औरंगाबाद 01 00 रत्नागिरी 01 00 सिंधुदुर्ग 01 00 कोल्हापूर 01 00 गोंदिया 01 00 जळगाव 01 00 बुलढाणा 01 01 इतर राज्यातील रुग्ण (गुजरात) 01 00 एकूण 203 08
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.