मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश, अन्यथा...; पाहा काय आहेत नवे नियम

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश, अन्यथा...; पाहा काय आहेत नवे नियम

राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लसीचे दोन्ही डोस (2 Dose of Corona Vaccine) घेणं गरजेचं असणार आहे. लसीच्या दोन्ही डोसमध्ये 14 दिवसांचं अंतर असणंही गरजेचं आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लसीचे दोन्ही डोस (2 Dose of Corona Vaccine) घेणं गरजेचं असणार आहे. लसीच्या दोन्ही डोसमध्ये 14 दिवसांचं अंतर असणंही गरजेचं आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लसीचे दोन्ही डोस (2 Dose of Corona Vaccine) घेणं गरजेचं असणार आहे. लसीच्या दोन्ही डोसमध्ये 14 दिवसांचं अंतर असणंही गरजेचं आहे.

मुंबई 14 ऑगस्ट : महाराष्ट्रात शनिवारपासून कोरोना व्हायरस अनलॉक (Coronavirus Unlock) प्रक्रियेच्या नव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. अनेक राज्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवे नियम बनवले आहेत. याच अंतर्गत आता महाराष्ट्रातील प्रवेशाबाबतच्या (Entry into Maharashtra) निर्णयातही मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लसीचे दोन्ही डोस (2 Dose of Corona Vaccine) घेणं गरजेचं असणार आहे. लसीच्या दोन्ही डोसमध्ये 14 दिवसांचं अंतर असणंही गरजेचं आहे. यासोबतच पुरावा म्हणून तुम्हाला तुमच्याजवळ लसीकरण प्रमाणपत्रही (Vaccination Certificate) ठेवावं लागेल. लस घेतली नसेल तर अशा स्थितीत आरटीपीसीआर रिपोर्ट (RTPCR Report) दाखवणं गरजेचं असेल. या नियमांचं पालन न करणाऱ्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल.

66 रुग्ण, 5 मृत्यू; कोणकोणत्या जिल्ह्यात थैमान घालतोय Delta plus पाहा

महाराष्ट्र सरकारनं कोरोना नियम काही प्रमाणात शिथील करत 15 ऑगस्टपासून मॉल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र, यासोबतच ही अटदेखील आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. याशिवाय दुकानंदेखील रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. स्पा आणि जिमलादेखील या अटीवर 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत परवानगी देण्यात आली की सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत.

लस घ्या आणि मालामाल व्हा! Vaccination नंतर Amazon कडून मिळणार कॅश, जाणून घ्या

इनडोअर गेम्सना परवानगी असेल, परंतु पुढील आदेश येईपर्यंत सिनेमा हॉल आणि प्रार्थनास्थळे बंद राहतील. मोकळ्या जागी होणाऱ्या लग्नांमध्ये 200 लोकांना सहभागी होण्याची परवानगी आहे तर बंद हॉलमध्ये 100 लोकं किंवा कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकं सहभागी होऊ शकतील. शॉपिंग मॉल, जिम, हॉटेल, स्पा आणि दुकानांना या अटीवर रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, की यातील सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. 17 ऑगस्टपासून शाळा आणि कॉलेज सुरू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. आज रात्री यासंदर्भात बैठक होईल.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccination