जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; पंकजा मुंडेंकडं महत्त्वाची जबाबदारी

मोठी बातमी! भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; पंकजा मुंडेंकडं महत्त्वाची जबाबदारी

पंकजा मुंडे

पंकजा मुंडे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवी कार्यकारणी जाहीर केली आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 29 जुलै : भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे.भाजपच्या या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये राष्ट्रीय संगठन महामंत्रिपदाची जबाबदारी बी. एल. संतोष यांच्याकडे सोपावण्यात आली आहे. तर राष्ट्रीय सह-संगठन महामंत्रिपदी शिवप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामंत्रिपदी महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना संधी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात