मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मृत्यूनंतरही अवहेलनाच! बीडमध्ये रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे शवगृहात मृतदेहाला लागल्या मुंग्या

मृत्यूनंतरही अवहेलनाच! बीडमध्ये रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे शवगृहात मृतदेहाला लागल्या मुंग्या

Beed News: काही दिवसांपूर्वी बीडमधील जिल्हा रुग्णालयात एका कोविडबाधित महिलेच्या मृतदेहाची (Covid patient) अवहेलना करण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असताना आता बीडमधून आणखी एक असंवेदनशील घटना समोर आली आहे.

Beed News: काही दिवसांपूर्वी बीडमधील जिल्हा रुग्णालयात एका कोविडबाधित महिलेच्या मृतदेहाची (Covid patient) अवहेलना करण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असताना आता बीडमधून आणखी एक असंवेदनशील घटना समोर आली आहे.

Beed News: काही दिवसांपूर्वी बीडमधील जिल्हा रुग्णालयात एका कोविडबाधित महिलेच्या मृतदेहाची (Covid patient) अवहेलना करण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असताना आता बीडमधून आणखी एक असंवेदनशील घटना समोर आली आहे.

बीड, 23 मे: काही दिवसांपूर्वी बीडमधील जिल्हा रुग्णालयात एका कोविडबाधित महिलेच्या मृतदेहाची (Covid patient) अवहेलना करण्यात आली होती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांसोबतच स्थानिक नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. हे प्रकरण ताजं असताना आता बीडमधून आणखी एक हलगर्जीपणाची (negligence of hospital) घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयात शवगृहात ठेवलेल्या मृतदेहाला चक्क मुंग्या लागल्याचा (Ants eat dead body) संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये पुन्हा संताप पाहायला मिळत आहे.

बीडजवळील पाडळसिंगी येथील 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीला 19 मे रोजी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार घेत असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनानं त्यांचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहात ठेवला. पण काही वेळातचं शवगृहात ठेवलेल्या मृतदेहाला मुंग्या लागल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेबाबत रुग्णालयाची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हे ही वाचा- जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटमध्ये बिघाड

पण संबंधित रुग्णालयात यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका कोरोना बाधित महिलेच्या मृतदेहाची हेळसांड केल्याप्रकरणी नातेवाईकांनी पोलीस ठाणं गाठलं होतं. हे प्रकरण ताजं असताना बीड जिल्हा रुग्णालयाचा आणखी एक गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

हे ही वाचा-...अन् कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह चादरीतच गुंडाळला, चिपळूणमधील धक्कादायक घटना

नागपूरात कचरा गाडीतून नेला मृतदेह

दुसरीकडे, नागपूरच्या बुट्टीबोरी याठिकाणी कोविड रुग्णाचा मृतदेह कचरा गाडीतून नेण्याचा प्रकारही समोर आला होता. बुट्टीबोरी नगरपरिषदेकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं त्यांनी कोविड रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी थेट कचरा गाडीचा वापर केला होता. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चिकळगुंडे यांना नागरिकांची आणि पीडित परिवाराची माफी मागावी लागली होती.

First published:

Tags: Beed news, Patient death