परभणी, 22 मे: महाराष्ट्रात कोविड सेंटर (Covid Center) आणि रुग्णालयांत होणाऱ्या दुर्घटना, अपघात काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात रुग्णालयांना लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत तर कुठे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळेही कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे. आता वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen supply) आता कुठे सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. याच दरम्यान परभणी जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटमध्ये (Oxygen plant breakdown in Covid center) बिघाड झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या कोविड (covid-19) सेंटरच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे काही काळासाठी ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम झाला होता.
पाहणी दौऱ्यावर न बोलावल्याने शिवसेना खासदार संतापले; थेट मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
शहरात सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरमधील, ऑक्सिजन प्लांटचे अगदी काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले होते.
उद्घाटनानंतर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांटमध्ये अचानक बिघाड झाला.
या घटनेमध्ये ऑक्सिजन प्लांटमधील पीव्हीसी पाईप फुटल्याने, दवाखाना परिसरामध्ये काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून ठेवल्याने, ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि पुढील अनर्थ टळला आहे. घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, या प्लांट्स दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.