आदित्य CM होण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचा टोला, प्रत्येकाला 'हा' अधिकार

आदित्य CM होण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचा टोला, प्रत्येकाला 'हा' अधिकार

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त जागा मिळतील असं म्हटलं आहे.

  • Share this:

मुबंई, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं रणांगण आता चांगलंच तापलं आहे. एकमेकांवर आरोप कऱण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. दरम्यान, युती सरकार आल्यास मुख्यमंत्री कोणाचा याची चर्चा सातत्यानं होत आहे. यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही संकल्पपत्राचे प्रकाशन करताना देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असं म्हटलं होतं.

आता न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, जसे लोकसभेचे निकाल आले तसेच विधानसभेचेही निकाल येतील. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपची युती असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातू आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चाही अधून मधून मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात होत असते त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस म्हणाले की, स्वप्न बघण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. दरम्यान, शिवसेनेत जर कोणाला बोलायचा अधिकार असेल तर तो फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे इतर कोण काय बोलतं याचा विचार केला जाणार नाही असंही फडणवीस म्हणाले.

गेल्या विधानसभेप्रमाणे या निवडणुकतही यश मिळेल का असं विचारलं असता फडणवीस म्हणाले की, यावेळी धमाकेदार विजय होईल. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 41 जागा जिंकल्या. असंच विधानसभेतही होईल. यावेळी जागांच्या गणितात पडायचं नाही असं सांगताना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकून भाजपच सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शाहांनी न्यूज18 नेटवर्कला EXCLUSIVE मुलाखत दिली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नसून देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं भाजप अध्यक्ष अमित शाहांनी न्यूज18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मिळून घेतील असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचं ठरलंय! 'हे' असणार महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 12:48 PM IST

ताज्या बातम्या