Home /News /maharashtra /

नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी अडवला ताफा, सुप्रिया सुळेंनी गाडीत बसवून नेलं कार्यक्रमाला, VIDEO

नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी अडवला ताफा, सुप्रिया सुळेंनी गाडीत बसवून नेलं कार्यक्रमाला, VIDEO

  मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दौऱ्यात स्थान न दिल्याने आणि एक ही कार्यक्रम न घेतल्याने कार्यकर्ते नाराज होते.

मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दौऱ्यात स्थान न दिल्याने आणि एक ही कार्यक्रम न घेतल्याने कार्यकर्ते नाराज होते.

मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दौऱ्यात स्थान न दिल्याने आणि एक ही कार्यक्रम न घेतल्याने कार्यकर्ते नाराज होते.

उस्मानाबाद, 29 मे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (ncp mp supriya sule) यांच्या उस्मानाबाद दौऱ्यात नाराजी नाट्य पाहण्यास मिळाले. नाराज झालेल्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी (ncp workers)  सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवला. पण, सुप्रिया सुळे यांनी सर्व नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि स्वत: च्या गाडीत कार्यकर्त्यांना बसवून बैठकीला घेऊन गेल्या. सुप्रिया सुळे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी  सुप्रिया सुळे यांचा ताफा काही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला.  राष्ट्रवादीचे मुस्लिम नगरसेवक आणि कार्यकर्ते नाराज  होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवला. सुप्रिया सुळे यांनीही रस्त्यावर गाडी बाजूला घेतली आणि नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर  त्यांनी नाराज कार्यकर्ते  स्वतःच्या गाडीत बसविले आणि त्या स्वतः दुसरी गाडीत बसल्या. मुस्लिम समाजाला उस्मानाबाद दौऱ्यात स्थान न दिल्याने आणि एक ही कार्यक्रम न घेतल्याने कार्यकर्ते नाराज होते. तसंच, सुळे यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला भेट न दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते.  अखेरीस पुढील कार्यक्रमस्थळी जाणार असल्यामुळे तिथे जाऊन सुप्रिया सुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांची पहिली बैठक घेतली. सुप्रिया सुळे यांच्याकडून डॉ पदमसिंह पाटील यांच्या आठवणीना उजाळा दरम्यान, सुप्रिया सुळे याा उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी तेर येथील संत गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी बोलताना सुळे यांनी पवार - पाटील कुटुंबाच्या आठवणीना उजाळा दिला. (Post Office च्या या योजनेत पैसे होतील डबल, पाहा कोणत्याही स्किममध्ये किती फायदा) डॉ.पदमसिंह पाटील व शरद पवार यांचे ऋणानुबंध हे गेली अनेक वर्षाचे आहेत. शरद पवार यांच्या चांगल्या वाईट काळात डॉ.पदमसिंह पाटील यांनी पाठीशी उभे राहत साथ दिली. डॉ पाटील यांनी दिलेली साथ मी तरी आयुष्यभर विसरणार नाही असे सांगत सुळे यांनी डॉ.पाटील यांच्या विषयी आदर व्यक्त केला. तसंच, ही अजित पवार यांची सासुरवाडी असल्याने नाते घट्ट आहे. डॉ पदमसिंह पाटील यांनी पवारांची साथ सोडत भाजप प्रवेश केला आहे. त्यानंतर दोन्ही परिवारात कटुता आली होती मात्र सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिल्याने त्याची चर्चा झाली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या