जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेती ते विधानभवन, राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा 'हा' फोटो होतोय व्हायरल!

शेती ते विधानभवन, राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा 'हा' फोटो होतोय व्हायरल!

शेती ते विधानभवन, राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराचा 'हा' फोटो होतोय व्हायरल!

राजकीय नेता म्हटल्यानंतर जो टिपिकल पेहेराव आणि सोबत कायम लवाजामा दिसतो. तसं काहीही त्यांच्याबाबतील दिसत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक 25 ऑक्टोंबर : महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेत तरुणांचं जसं प्रतिनिधीत्व जास्त आहे. तसच विविध क्षेत्रातल्या अनेक नेत्यांनीही विधानसभेत प्रवेश केलाय. यात ग्रामीण भागातल्या अनेक नेत्यांनीही आपल्या वैशिष्ट्यांनी विधिमंडळात वेगळी ओळख निर्माण केली. निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत दिंडोरीचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांनी बाजी मारलीय. निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणं हे तसं कठीण काम असतं मात्र त्यांनी शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार भास्कर गावीत यांचा 60 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय. हाडाचे शेतकरी असलेल्या झिरवळ यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. झिरवळांचा हा जुना पण आमदार असतानाचा तो फोटो असून ते नांगरणी करत असल्याचं त्यात दिसतंय. पाच वर्ष आमदार राहिल्यानंतरही त्यांचा हा साधेपणा लोकांना भावलाय. ‘तुफान’ गाजलेल्या त्या पाऊस भाषणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केला खुलासा! दिंडोरी मतदारसंघातून झिरवळ यांनी शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावीत यांचा 60 हजार 813 मतांनी पराभव केला. पाच वर्षानंतर त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झालीय. उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी आपला व्यवसाय हा शेती आणि पशूपालन असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

सोनिया गांधींचा शरद पवारांना खास फोन, शुभेच्छा देताना म्हणल्या…

आमदार नरहर झिरवळ यांची साधी राहणी हा पूर्ण मतदारसंघातच खास चर्चेचा विषय असतो. राजकीय नेता म्हटल्यानंतर जो टिपीकल पेहेराव आणि सोबत कायम लवाजामा दिसतो. तसं काहीही त्यांच्याबाबतील दिसत नाही. कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही सहज त्यांना भेटू आणि बोलू शकतात. झिरवळही कुठलाही बडेजाव न करतात सगळ्यांमध्ये मिसळतात त्यामुळे त्यांचा जनसंपर्क थेट आणि प्रचंड आहे. निवडणुकीत ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचं दिंडोरीत सांगितलंय जासंय. सोशल मीडियावरही त्यांचा हाच साधेपणा लोकांना भावतोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात