जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'एकदा चंद्रकांतदादांशी बोलावं लागेल', मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

'एकदा चंद्रकांतदादांशी बोलावं लागेल', मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरून जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम कुठे अडले नाही, ते पूर्ण क्षमतेने काम करत आहे. आता पाटील अशी रोज रोज मागणी'

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम कुठे अडले नाही, ते पूर्ण क्षमतेने काम करत आहे. आता पाटील अशी रोज रोज मागणी'

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम कुठे अडले नाही, ते पूर्ण क्षमतेने काम करत आहे. आता पाटील अशी रोज रोज मागणी’

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 14  जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पदभार दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) वारंवार करत आहे. पण मुख्यमंत्री ठाकरे हे तर कामावर रुजू झाले आहे, कालच त्यांनी बैठक घेतली,जर पाटील अशीच मागणी रोज करत असतील तर एकदा बोलावे लागेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी खिल्ली उडवली. सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील यांनी उत्तर प्रदेश निवडणुका आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर प्रतिक्रिया दिली. ‘देशात भाजपाला सोडून आता मतदार दुसर्‍या बाजूला झुकत आहे. हे प्रत्येक राज्यात पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे विद्यमान मंत्री देखील भाजपा सोडून इतर पक्षात जात आहे, याचा भाजपने विचार केला पाहिजे,  असा टोला जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. ( गुड न्यूज ! मुंबईत नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट ) तसंच,  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे पदभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, ही तर त्यांची जुनी मागणी आहे. मुळात मुख्यमंत्री ठाकरे हे कामावर रूजू झाले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते बैठकांना हजर राहत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम कुठे अडले नाही, ते पूर्ण क्षमतेने काम करत आहे. आता पाटील अशी रोज रोज मागणी करत असेल तर मला त्यांच्याशी बोललं पाहिजे, ते रोज का बोलत आहेत, हे मला कळले पाहिजे’ असा टोला लगावला.  चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी पदभार दुसऱ्याकडे सोपविण्याची वेळ आली आहे का? असे एका पत्रकाराने विचारले असता चंद्रकांत पाटलांनी त्यावर उत्तर दिले. “राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात