जामनेर, 17 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांना सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, अशी टीका खडसेंनी केली आहे. जामनेरमध्ये सोनिया गांधी यांची भव्य सभा झाली, त्यामुळे गिरीश महाजन यांनी माझे पाय धरले आणि शत्रुघ्न सिन्हा यांची सभा जामनेरमध्ये घेण्याची विनंती केली, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘गिरीश महाजनांसाठी बोदवडमधील शत्रुघ्न सिन्हा यांची सभा रद्द करून जामनेरमध्ये घेतली, त्यामुळे गिरीश महाजन विजयी झाले,’ असंही एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी, दूध संघाचा वाद घराणेशाहीवर गेला ‘माझ्यामागे गिरीश महाजन यांनी ईडी लावली म्हणूनच गिरीश महाजन यांना मी मोक्का लावला,’ असा गौप्यस्फोटही एकनाथ खडसे यांनी केला. एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी आले होते. ‘गिरीश महाजन यांनी माझे पाय धरून बोदवड येथील शत्रुघ्न सिन्हा यांची सभा जामनेरमध्ये घेण्याची विनंती केली आणि माझ्या मतदारसंघातील सभा रद्द करून मी शत्रुघ्न सिन्हा यांची सभा जामनेरमध्ये घेतल्याने गिरीश महाजन विजयी झाले आणि तेच आता मला संपवण्याची भाषा करतात,’ असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.