Home /News /viral /

भयंकर! हत्तीवर फेकला जळता टायर, माणसाच्या क्रुरतेचा आणखी एक बळी

भयंकर! हत्तीवर फेकला जळता टायर, माणसाच्या क्रुरतेचा आणखी एक बळी

निसर्गाप्रति माणसाच्या क्रुरतेचं दर्शन सातत्याने घडत आहे, हे आजच्या काळातील दु:ख आहे. असाच व्हिडीओ समोर येत आहे जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

    मसिनागुडी, 23 जानेवारी: निसर्गाप्रति माणसाच्या क्रुरतेचं दर्शन सातत्याने घडत आहे, हे आजच्या काळातील दु:ख आहे. असाच व्हिडीओ समोर येत आहे जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी एका 40 वर्षीय हत्तीला किती भयंकर पद्धतीने मृत्यूच्या हवाली केलं, याचा हा VIDEO आहे. तामिळनाडूच्या निलगिरीमधील ही घटना आहे. या भागातील मसिनागुडी क्षेत्रात ही भयंकर घटना घडली. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी हत्तीवर जळता टायर फेकला आणि जो त्याच्या कानात अडकला होता. सैरभैर झालेला हत्ती माणसाच्या क्रुरतेपुढे त्यावेळी हतबल झाला होता. जंगलातील अधिकाऱ्यांना जेव्हा हत्ती सापडला, तेव्हा त्याच्या कानातून रक्त येत होते. त्याला वाचवण्याचा प्रयत्न वनअधिकाऱ्यांनी केला मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आलं. 18 जानेवारी रोजी या हत्तीने प्राण सोडले. ज्यावेळी या नराधमांनी जळता टायर त्याच्यावर फेकला त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान अशी माहिती समोर येते आहे की, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींच्या मोबाइलमध्ये सापडला आहे. तामिळनाडूमधील या भयंकर प्रकाराने प्राणीप्रेमी काय इतर कुणालाही धक्काच बसेल. मुदुमलाई टायगर रिझर्व्हमध्ये या हत्तीला उपचारासाठी नेण्यात आलं होतं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्याचा जीव वाचला नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या