अकोला, 12 जुलै: शिवव्याख्याते आणि राष्ट्रवादीचे (NCP) विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा इथं भर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा (paralyzed attack) सौम्य झटका आला. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. राष्ट्रवादीत दाखल झालेल्या गायिका वैशाली माडे या अकोल्या दौऱ्यावर होत्या. त्यांच्याकडे राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बिफॉर्म कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमोल मिटकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
रोईंगपटू दत्तू भोकनळवर नांगरणी करण्याची वेळ, सैन्यदलाला ठोकला रामराम
त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ‘माझी मैना गावाकड राहिली..’ ही छक्कड गायला सुरुवात केली. पण, अचानक मिटकरी यांचा आवाज बसला आणि त्यांचा चेहरा वाकडा होत असल्याचे जाणवू लागले, त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना सांभाळलं. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलं, असं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिलं आहे.
कोरोनातही IIT विद्यार्थी मालामाल;Microsoftकडून 10 विद्यार्थ्यांना 45.3 लाख पॅकेज
अमोल मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. अमोल मिटकरी यांची प्रकृतीत आज सुधारणा झाली आहे. माझी प्रकृती आता ठीक असून कोविडची परिस्थिती असल्यामुळे मला भेटायला येऊ नये, मी आता ठीक आहे, अशी विनंती मिटकरी यांनी केली आहे.