मुंबई, 4 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली होती. नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याकडे राज्याच लक्ष लागलं आहे. लवकरच खातेवाटप जाहीर केलं जाणार आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहिती प्रमाणे अजित पवार यांना महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, खातेवाटपाबद्दल खुद्द अजित पवार यांनीच आतली बातमी सांगितली आहे. काय म्हणाले अजित पवार? सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. छगन भुजबळ ओबीसी कल्याण, दिलीप वळसे पाटील संसदीय कार्य आणि कृषी मंत्रालय, हसन मुश्रीफ औकाफ आणि कामगार कल्याण मंत्रालय, आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास खातं, धनंजय मुंडे यांना समाज कल्याण मंत्रालय, संजय बनसोड क्रीडा आणि युवक कल्याण, अनिल पाटील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तर धर्माराव आत्राम यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबादारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, खाते वाटपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रार्थमिक चर्चा झाली आहे. त्यांना आज नागपूरला जायचं असल्याने पुर्ण चर्चा झाली नाही. रात्री उशीरा याबाबत निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. वाचा - BRS : राष्ट्रवादीमध्ये फूट पडताच बीआरएस अॅक्टिव्ह; पुणे, नाशिकसाठी आखला खास प्लॅन मंत्रिपदासाठी लॉबिंग दरम्यान राज्यपालांची सही झाल्यानंतर अधिकृतरित्या खाते वाटप जाहीर केलं जाणार आहे. खाते वाटपात चांगलं मंत्रालय मिळावे यासाठी अनेक मंत्र्यांचे लॉबिंगही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्र्यांमध्ये चांगेल खाते मिळावे यासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे ऐनवेळी देखील खाते वाटपात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.