'मला अटक केली तरी चालेल, पण...' ; शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2019 03:38 PM IST

'मला अटक केली तरी चालेल, पण...' ; शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 8 ऑक्टोबर : 'सरकारने मागील 5 वर्षात सर्वसामान्य माणसाचे हित जपले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे. भाजपा आणि सेनेला शेतीतले काही कळत नाही. कांद्याची वाईट अवस्था आहे. सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी परिस्थिती असताना सरकारने निर्यात बंदी केली हे सरकारचे शेतकाऱ्यांवरील प्रेम,' असा टोला लगावत शरद पवार यांनी शेतकरी प्रश्नावरून सरकारला लक्ष्य केलं.

'हे सरकार सीबीआय, ईडी, पोलीस यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत आहे. पण आम्ही कशाला घाबरत नाही. गुन्हे दाखल करा नाहीतर अटक करा, पण शेतकरी, कामगार, युवक यांच्या प्रश्नांवर आपण बोलत राहू,' असं म्हणत शरद पवार यांनी सरकारला आव्हान दिलं. निवडणुकीच्या निमित्ताने या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम जनतेने करावं, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. विधानसभा प्रचारासाठी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी आज पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

शरद पवारांचा हल्लाबोल

- महाराष्ट्रात कुणाचेही कर्ज माफ झाले नाही, आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी दिली होती.

Loading...

- या वर्षी 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत

- 500 उद्योजकांसाठी सरकारने 78 हजार कोटी बँकेचे भरले, मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.

- सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योगाचे आणि शेतकऱ्याचे नुकसान केले.

- राज्य सहकारी बँक, या बँकेने काही कारखाने अडचणीत आले म्हणून मदत केली, बँक प्रकरणात माझे नाव आले ही काय भानगड झाली?

- बँकेचे डायरेक्टर माझ्या ओळखीचे त्यात माझा काय संबंध?

दरम्यान, शरद पवार यांनी पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. शरद पवार यांच्या 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंतच्या झंझावाती दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

सततच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील अनेक भागांत सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते सरकारवर निशाणा साधत राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

शरद पवारांची सभा कुठे, कधी होणार?

- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता

- पारोळा सायंकाळी 5 वाजता

- विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता.

- वाशिम जिल्ह्यातील मानोरा - कारंजा दुपारी 4 वाजता

- हिंगणघाट इथं दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता

- बुटीबोरी- हिंगणा 3 वाजता

- काटोल सायंकाळी 5 वाजता

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...