Home /News /maharashtra /

मुंबईत NCB ची कारवाई! मोठा साठा जप्त करत ड्रग्स पॅडलरसह 5 जणांना घेतलं ताब्यात

मुंबईत NCB ची कारवाई! मोठा साठा जप्त करत ड्रग्स पॅडलरसह 5 जणांना घेतलं ताब्यात

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते एनसीबीच्या रडावर

    मुंबई, 8 नोव्हेंबर: बॉलिवूडमधील (Bollywood) ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाची पाळमुळं शोधण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) मुंबईसह महाराष्ट्रात धडक कारवाई  सुरू केली आहे . मुंबईत NCB नं रविवारी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 6 किलो गांजासह एमडी आणि एलएसबी ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं आहे. तर NCB नं 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यात 1 ड्रग्स पॅडलर तर 4 सप्लायर्सचा समावेश आहे. कारवाईत 3 एसयूव्ही गाड्या देखील भी जप्त केल्याची माहिती NCB च्या सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा...राजकारणाची दिशा बदलणार! कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा सेनेचा इरादा बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माते NCBच्या रडारवर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी झाल्यानंतर आता एनसीबीच्या रडावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. हे निर्माते आणि दिग्दर्शकांकडे एनसीबीच्या छापेमारीस सुरूवात झाली आहे. मिळालेल्या माहितीसुसार शनिवारी रात्रभर ही छापेमारी सुरू होती असून यामध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. यामध्ये बॉलिवूडमधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी रात्री छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान एनसीबीने या निर्माते आणि दिग्दर्शकांची नावं उघड करण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरातून काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त केले आहेत, शनिवारी रात्रीपासून सुरू असलेली छापेमारी अद्यापही सुरू आहे. एनसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत काही ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नावं समोर आली आहेत. त्या नावांच्या आधारेच एनसीबीने ही छापेमारी केली आहे. या पेडलर्सच्या जबाबाच्या आधारे अद्याप एनसीबीकडून कारवाई सुरू आहे. हेही वाचा..नालासोपारा हादरलं, वाघोलीत केबलचालकाची कोयत्याने वार करून हत्या दरम्यान, अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh), सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावं ड्रग केसमध्ये समोर आल्यानंतर आता निर्माते-दिग्दर्शकांपैकी कुणाचे नाव समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bollywood, Maharashtra, Mumbai, Mumbai police

    पुढील बातम्या