मुंबई, 28 फेब्रुवारी: मनी लाँड्रिंग प्रकरणाचा आरोप ठेवून ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केली आहे. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून (Maharashtra Minister Nawab Malik Discharged to JJ Hospital Mumbai)डिस्चार्ज मिळाला तर दुसरीकडे मलिक यांच्या मुलाला देखील ईडीनं समन्स पाठवले आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळी नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना घेऊन अधिकारी ईडी कार्यालयाच्या पोहोचले. टीम इंडियानं 12 दिवसांमध्ये जिंकल्या 2 सीरिज ‘हे’ 5 जण ठरले विजयाचे शिल्पकार गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पहाटे सहा वाजताच ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर चौकशीसाठी मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. मात्र नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नवाब मलिक यांच्या 3 मागण्या कोर्टाकडून मान्य ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयासमोर तीन मागण्या केल्या होत्या नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या आहेत. आपल्याला घरचे जेवण आणि औषधी मिळावी अशी मागणी मलिक यांनी केली होती. ती मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.