मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...मग नवनीत राणांनी काय परिणाम होतात ते बघावे, शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा थेट इशारा

...मग नवनीत राणांनी काय परिणाम होतात ते बघावे, शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा थेट इशारा

लोकप्रतिनिधी झाल्यानंतर राजकीय संस्कृती पाळली पाहिजे. आपण खासदार आहोत, याचे भान राखले पाहिजे.

लोकप्रतिनिधी झाल्यानंतर राजकीय संस्कृती पाळली पाहिजे. आपण खासदार आहोत, याचे भान राखले पाहिजे.

लोकप्रतिनिधी झाल्यानंतर राजकीय संस्कृती पाळली पाहिजे. आपण खासदार आहोत, याचे भान राखले पाहिजे.

रत्नागिरी, 17 एप्रिल :  हनुमान चालिसाच्या (hanuman chalisa) मुद्यावर खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्यावर निशाणा साधला आहे. तर,  नवनीत राणा यांच्यासाठी 'मातोश्री'चा पल्ला अजून लांब आहे.त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे, असा इशाराच शिवसेनेचे नेते आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी दिला.

रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना उदय सामंत यांनी कोल्हापूर निवडणुकीच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. तसंच राणा दाम्पत्यांना कडक इशारा दिला.

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याची फॅशन सुरू झाली आहे. त्यांच्यावर बोलण्यामुळे मुलाखती घेतल्या जात्यात. प्रसिद्ध मिळते.  मातोश्रीवर येणे हे फारच लांब आहे. नवनीत राणा यांच्यासाठी 'मातोश्री'चा पल्ला अजून लांब आहे. त्यांनी अमरावतीमधील एखाद्या शाखा प्रमुख किंवा गट प्रमुखचे घर निवडत तारीख सांगावी आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघावे, असा इशाराच सामंत यांनी दिली.

(लव्ह, सेक्स अँड मर्डर, 19 वर्षीय तरुणासोबत समलैंगिक संबंध ठेवले अन्....)

लोकप्रतिनिधी झाल्यानंतर राजकीय संस्कृती पाळली पाहिजे. आपण खासदार आहोत, याचे भान राखले पाहिजे. राणा यांनी सेनेच्या एखाद्या गटप्रमुखाच्या घरासमोर तरी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, मग बघा काय परिणाम होतात,  मुळात ज्यांना राजकीय संस्कृती नाही त्यावर काय बोलावं?  असा टोलाही सामंत यांनी लगावला.

कोल्हापूरमध्ये भाजप एकटा लढला असं सांगितलं जात आहे. पण घटक पक्ष त्यांच्यासोबत होते. आरपीआय होता, ताराराणी पक्ष होता, त्यांची मत यांना मिळालीच नाही का?  फक्त इतर पक्षांची कोल्हापूरच्या निवडणुकीत मते नाहीत का? याच अर्थाने मी ट्विट केल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

शिवसैनिकांचा नवनीत राणांच्या घरावर हल्लाबोल

दरम्यान,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर हनुमान चालिसा करावा अन्यथा आम्ही मतोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू या राणा दाम्पत्याच्या वक्तव्यानंतर नवनीत राणा व रवी राणा आणि शिवसैनिकात राजकीय ठिणगी उडाली आहे. आज राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री या निवसस्थानासमोर शिवसैनिक हजारोच्या संख्येने गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना राणा यांच्या घराच्या आधीच अडवले. यावेळी पोलीस व शिवसैनिकात प्रचंड झटापट झाली.

(Android फोनसाठी Google ने बंद केलं हे फीचर, आता कधीच वापरता येणार नाही)

यावेळी राणा दाम्पत्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राणा यांच्या घरासमोर राणा समर्थकांनी एकच गर्दी केली होती.  राणा यांना आपल्या घरासमोर हनुमान चालीसाही लावली होती. मात्र शिवसैनिक यांना पोलिसांनी राणा यांच्या घरावर येऊ दिले नाही. शिवसेना मात्र आक्रमक असून राणा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील मशिदीवर आसलेले भोंगे उतरून दाखवावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने देण्यात आला

First published: